'पळवून पळवून चपलांनी मारीन...', बसपा उमेदवाराकडून राज बब्‍बर यांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 01:54 PM2019-04-16T13:54:12+5:302019-04-16T14:53:09+5:30

समाजवादी पार्टीचे नेते आझम खान, हिमाचल प्रदेशातील भाजपा प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंह सत्ती यांनी केलेली वादग्रस्त विधाने चर्चेत असतानाच आता उत्तर प्रदेशातील बसपाचे उमेदवार गुड्डू पंडित यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. 

bsp candidate guddu pandit abuses congresss raj babbar in fatehpur sikri lok sabha polls 2019 | 'पळवून पळवून चपलांनी मारीन...', बसपा उमेदवाराकडून राज बब्‍बर यांना धमकी

'पळवून पळवून चपलांनी मारीन...', बसपा उमेदवाराकडून राज बब्‍बर यांना धमकी

Next

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली असून सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना उमेदवार खालच्या पातळीवर टीका करताना दिसत आहे. समाजवादी पार्टीचे नेते आझम खान, हिमाचल प्रदेशातील भाजपा प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंह सत्ती यांनी केलेली वादग्रस्त विधाने चर्चेत असतानाच आता उत्तर प्रदेशातील बसपाचे उमेदवार गुड्डू पंडित यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. 

बसपाचे उमेदवार गुड्डू पंडित यांनी उत्‍तर प्रदेशातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उमेदवार राज बब्‍बर यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. फतेहपूर सिकरी येथील प्रचारादरम्यान गुड्डू पंडित यांनी राज बब्‍बर आणि त्‍यांच्या समर्थकांना एकप्रकारे धमकी दिली आहे. यासंदर्भातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये 'ऐका राज बब्बरच्या कु#$, तुम्हाला आणि तुमच्या नेत्यांना पळवून पळवून चपलांनी मारीन. जे समाजात चुकीचा समज पसरवत आहेत त्यांना चपलांनी मारीन. तसेच तुझ्या आणि तुच्या दलालांना मारीन.' अशा शब्दात गुड्डू पंडित यांनी राज बब्बर यांच्यावर सडकून टीका केली आहे. 


दरम्यान, फतेहपूर सिकरी मतदारसंघासाठी 18 एप्रिलला मतदान होणार आहे. या मतदार संघात बसपाकडून गुड्डू पंडित निवडणूक लढवत आहेत, तर त्‍यांच्याविरोधात भाजपाकडून राजकुमार चाहर आणि काँग्रेसकडून राज बब्‍बर हे निवडणूक लढवत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत फतेहपूर सिकरी मतदार संघातून भाजपाचे बाबूलाल चौधरी विजयी झाले होते.  

Web Title: bsp candidate guddu pandit abuses congresss raj babbar in fatehpur sikri lok sabha polls 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.