यूपीमध्ये सपा, बसप, काँग्रेसची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी धडपड - नरेंद्र मोदी
By admin | Published: February 20, 2017 06:31 PM2017-02-20T18:31:24+5:302017-02-20T18:31:24+5:30
उत्तरप्रदेशात परिवर्तनाचे वादळ आले असून, समाजवादी पक्ष, बसप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी धडपड सुरु आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 20 - उत्तरप्रदेशात परिवर्तनाचे वादळ आले असून, समाजवादी पक्ष, बसप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी धडपड सुरु आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेमध्ये केला. ते फुलपूर येथी सभेमध्ये बोलत होते. उत्तरप्रदेशात पहिल्या तीन टप्प्यात झालेल्या मतदानानंतर मोदींनी हा दावा केला.
प्रतिष्ठा राखण्यापुरत्या जागा मिळवण्यासाठी सपा, बसप आणि काँग्रेसचा आटापिटा सुरु आहे असे त्यांनी सांगितले. पहिल्या तीन टप्प्यात मतदारांनी भाजपाच्या बाजूने मोठया प्रमाणावर मतदान केल्याचा त्यांचा दावा आहे. तीन पक्ष आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी धडपडत आहेत तर, दुस-याबाजूला भाजपा उत्तरप्रदेशच्या जनतेचे भवितव्य बदलण्यासाठी काम करत आहे असे ते म्हणाले.
अखिलेश यादव तुम्ही म्हणता काम बोलते. मग अलाहाबाद उच्च न्यायालयाने तुमच्या योजना आणि आदेश का रोखले ?, न्यायालयाने तुमच्यावर ताशेरे का ओढले ? असे प्रश्न मोदींनी विचारले.