मायावतींचा राजकीय डाव; आजपासून अयोध्येत बसपाचं ब्राह्मण सम्मेलन, ...म्हणून यूपीत महत्वाचं आहे 'हे' खास समिकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 09:32 AM2021-07-23T09:32:29+5:302021-07-23T09:37:40+5:30

...तेव्हा मायावतींचे समिकरण अगदी फिट बसले होते आणि त्या सत्तेत आल्या होत्या. आता यावेळी त्या, दलित, ब्राह्मण आणि मुस्लीम समीकरण तयार करून सत्तेत येण्याच्या तयारीत

BSP convention in ayodhya today ahead of assembly election in up | मायावतींचा राजकीय डाव; आजपासून अयोध्येत बसपाचं ब्राह्मण सम्मेलन, ...म्हणून यूपीत महत्वाचं आहे 'हे' खास समिकरण

मायावतींचा राजकीय डाव; आजपासून अयोध्येत बसपाचं ब्राह्मण सम्मेलन, ...म्हणून यूपीत महत्वाचं आहे 'हे' खास समिकरण

Next
ठळक मुद्देदुपारी 1 वाजता अयोध्येतील तारा जी रिसॉर्टमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होईल. सायंकाळी सतीश चंद्र मिश्रा शरयू आरतीतही सहभागी होतील.बसपाच्या या ब्राह्मण सम्मेलनावरून वादही निर्माण झाला आहे.


लखनौ - उत्तर प्रदेशात पुढील वर्षात विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर मायावतींनी राजकीय खेळी खेळली आहे. उत्तर प्रदेशात जातीय समिकरण साधण्यासाठी आजपासून बसपा संपूर्ण राज्यात ब्राह्मण सम्मेलनाचे आयोजन करत आहे. विशेष म्हणजे रामाची नगरी असलेल्या अयोध्येतून ब्राह्मण सम्मेलनांची सुरुवात होत आहे. बसपा सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. अयोध्येनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, अशा प्रकारच्या सम्मेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे. (BSP convention in ayodhya today ahead of assembly election in up)

दलित, ब्राह्मण आणि मुस्लीम समीकरण -
दुपारी 1 वाजता अयोध्येतील तारा जी रिसॉर्टमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होईल. यानंतर सायंकाळी सतीश चंद्र मिश्रा शरयू आरतीतही सहभागी होतील. मायावतींनी 2007 मध्ये विधानसभा निवडणुकीत दलित आणि ब्राह्मण मतांवर लक्ष केंद्रित केले होते. तेव्हा मायावतींचे समिकरण अगदी फिट बसले होते आणि त्या सत्तेत आल्या होत्या. आता यावेळी त्या, दलित, ब्राह्मण आणि मुस्लीम समीकरण तयार करून सत्तेत येण्याच्या तयारीत आहेत.

या ठिकाणी पेच -
बसपाच्या या ब्राह्मण सम्मेलनावरून वादही निर्माण झाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशात राजकीय पक्षांच्या जातीय सम्मेलनांवर आणि रॅलींवर बंदी घातली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने 11 जुलै 2013 रोजी मोती लाल यादव यांनी दाखल केलेल्या पीआयएल क्रमांक 5889 वर सुनावणी करताना उत्तर प्रदेशात राजकीय पक्षांची जातीय आधारावरील सम्मेलने, रॅली आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घातली होती. 

जस्टिस उमानाथ सिंह आणि जस्टिस महेंद्र दयाल यांच्या डिव्हिजन बेंचने निर्णय देताना म्हटले होते, की राजकीय पक्षांच्या जातीय सम्मेलनांमुळे समाजात मतभेद वाढतात आणि निष्पक्ष निवडणुकीलाही अडथळा निर्माण होतो.
 

Web Title: BSP convention in ayodhya today ahead of assembly election in up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.