बसप नेत्याच्या मुलाने केला धावत्या कारमध्ये बलात्कार

By Admin | Published: July 16, 2014 11:38 AM2014-07-16T11:38:32+5:302014-07-16T12:50:25+5:30

बंगळुरु येथे बहुजन समाज पक्षातील एका नेत्याच्या मुलाने २२ वर्षीय तरुणीवर कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

BSP leader's son rape in a running car | बसप नेत्याच्या मुलाने केला धावत्या कारमध्ये बलात्कार

बसप नेत्याच्या मुलाने केला धावत्या कारमध्ये बलात्कार

googlenewsNext

 

ऑनलाइन टीम
बंगळुरु, दि. १६ - बंगळुरु येथे बहुजन समाज पक्षातील एका नेत्याच्या मुलाने २२ वर्षीय तरुणीवर कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकऱणी पोलिसांनी बसप नेत्याचा मुलगा नासीर हैदर (वय २३) याला अटक केली असून त्याचे चार साथीदार अद्याप फरार आहेत. 
बंगळुरुत राहणारी २२ वर्षीय तरुणी तिच्या मित्रांसोबत डिनरसाठी गेली होती. रात्री उशीर झाल्याने तरुणीचा मित्र तिला सोडण्यासाठी तिच्या घरापर्यंत आला होता. दोघेही घराखाली गाडीत गप्पा मारत असताना स्कोडा गाडीतून नासीर व त्याचे पाच सहकारी तिथे पोहोचले. या सर्वांनी पोलिस असल्याची बतावणी करुन तरुणीच्या गाडीत जबरदस्तीने प्रवेश केला. यानंतर पिडीत तरुणी व तिच्या मित्राला मागच्या सीटवर बसवण्यात आले आणि चौघांपैकी एकाने गाडी चालवायला सुरुवात केली. 
नराधमांनी गाडी एका निर्जनस्थळी नेली. तरुणीच्या मित्राला चाकूचा धाक दाखवत गाडीच्या बाहेर नेण्यात आले. यानंतर हैदरने पिडीत तरुणीवर बलात्कार केला. बलात्कारानंतर नराधमांनी पिडीत तरुणी व तिच्या मित्राकडे ५० हजार रुपयेही मागितले. मात्र पैसे नसल्याने त्यांनी तरुणाचे घड्याळ घेऊनच घटनास्थळावरुन पोबारा केला. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार झाल्यावर पोलिसांनी नासीर हैदरला अटक केली. तर अन्य चौघांचा शोध सुरु आहे.

Web Title: BSP leader's son rape in a running car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.