मायावतींना मोठा धक्का, खासदार मलूक नागर यांचा BSP सोडून RLD मध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 12:44 PM2024-04-11T12:44:37+5:302024-04-11T13:01:14+5:30
Lok Sabha Elections 2024: मलूक नागर हे बसपाच्या ताकदवान नेत्यांपैकी एक होते. तसेच, ते मायावतींचेही जवळचे मानले जात होते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी बसपा प्रमुख मायावती यांना मोठा झटका बसला आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौरचे खासदार मलूक नागर यांनी बसपाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर मलूक नागर यांनी आरएलडीमध्ये प्रवेश केला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मायावती यांनी मलूक नागर यांचे तिकीट रद्द केले होते. त्यांची जागी बसपाने विजेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मलूक नागर हे नाराज असल्याचे म्हटले जाते होते.
मलूक नागर हे बसपाच्या ताकदवान नेत्यांपैकी एक होते. तसेच, ते मायावतींचेही जवळचे मानले जात होते. आरएलडीमध्ये प्रवेश केल्यानंतर मलूक नागर म्हणाले, "मी २००६ पासून बसपामध्ये होते. हा एक ऐतिहासिक विक्रम आहे कारण १८ वर्षे बसपामध्ये कोणीही राहिले नाही. बसपामध्ये लोकांना पक्षातून बाहेर काढले जाते किंवा पक्ष सोडला जातो. मी २०२२ मध्ये आमदारकीची निवडणूक लढवली नाही आणि २०२४ मध्ये खासदारकीची निवडणूकही लढवली नाही. घरी बसून देशासाठी काम करायचे नाही, हे योग्य नाही."
#WATCH दिल्ली: पूर्व बसपा नेता मलूक नागर ने राष्ट्रीय लोक दल में शामिल होने पर कहा, "...साल 2006 से मैं बसपा में हूं... ये ऐतिहासिक रिकॉर्ड है क्योंकि 18 साल तक बसपा में कोई और नहीं टिका... बसपा में एक-डेढ़ योजना में लोग या तो पार्टी से निकाल दिए जाते हैं या तो पार्टी छोड़कर चले… https://t.co/VJfSqFEMXQpic.twitter.com/A6LbSkVrJz
— ANI_HindiNews (@AHindinews) April 11, 2024
दरम्यान, याआधी मलूक नागर यांनी म्हटले होते की, घरी बसू शकत नाही, त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. मी १८ वर्षांपासून या पक्षात आहे. मला देश आणि जनतेसाठी काम करायचे आहे. तसेच, एका टर्मनंतर एकतर तुम्हाला पक्षातून हाकलून दिले जाईल किंवा पक्ष तुम्हाला घरी बसवेल, असा बसपाचा इतिहास आहे, असे मलूक नागर यांनी सांगितले होते.
मलूक नागर यांनी २००९ची लोकसभा निवडणूक मेरठमधून बसपाच्या तिकीटावर लढवली होती, पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी बिजनौरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती, परंतु त्यावेळीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते बिजनौरमधून विजयी झाले होते. यावेळीही त्यांना येथून तिकीट मिळेल अशी आशा होती मात्र पक्षाने त्यांच्या आशा धुळीस मिळवल्या. यावेळी बसपाने विजेंद्र सिंह यांना येथून तिकीट दिले आहे.
सर्वात श्रीमंत खासदारांपैकी एक मलूक नागर
मलूक नागर हे उत्तर प्रदेशातील सर्वात श्रीमंत खासदारांपैकी एक आहेत. त्यांनी प्रतिज्ञापत्रात 249 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. मलूक नागर हे मोठे व्यापारी आहेत. त्यांचा रियर स्टेटचा व्यवसाय आहे. आयकर विभागाने ऑक्टोबर 2020 मध्ये मलूक नागर यांच्या कंपन्यांवर छापे टाकले होते.