Budget 2017 - शेअर बाजाराचा Positive प्रतिसाद
By admin | Published: February 1, 2017 02:26 PM2017-02-01T14:26:15+5:302017-02-01T14:26:15+5:30
अरुण जेटली यांनी सादर केलेल्या 2017च्या केंद्रीय अर्थसंकल्पाला शेअर बाजाराने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - अरुण जेटली यांनी सादर केलेल्या 2017च्या केंद्रीय अर्थसंकल्पाला शेअर बाजाराने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लोकसभेमध्ये जेटली यांचे भाषण सुरु असताना सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ होत गेली. अर्थसंकल्पीय भाषण संपले त्यावेळी शेअर बाजाराने एका टक्का वाढ नोंदवली होती.
भाषण संपले त्यावेळी सेन्सेक्स 300 अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 80 अंकांची वाढ झालेली होती. अर्थसंकल्पीय भाषणाच्या आधी दोन दिवसांमध्ये सेन्सेक्समध्ये 226 अंकांची घसरण झाली होती.
50 कोटीपर्यंत उलाढाल असलेल्या कंपन्यांना करामध्ये 5 टक्क्यांची सवलत मिळाली आहे. 30 वरुन त्यांचा कर 25 टक्के करण्यात आला आहे. अर्थसंकल्पातून विकासाचे आशादायक चित्र उभे राहिल्याने शेअर बाजाराने सकारात्मक संकेत दिले आहेत.