Budget 2018 : येत्या वर्षात 51 लाख घरं बांधणार, 2022 पर्यंत प्रत्येक गरीबाला घर - अरूण जेटली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 12:08 PM2018-02-01T12:08:52+5:302018-02-01T12:19:24+5:30
गेल्या तीन वर्षापासून सरकार गरीब आणि मध्यम वर्गाला केंद्रस्थानी ठेऊन काम करत आहे. 2022 पर्यंत प्रत्येक गरीबाला घर देण्याचा सरकारचं लक्ष्य, आतापर्यंत 51 लाख घरं बांधली असून येत्या वर्षातही 51 लाख घरं बांधणार.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली देशाचा 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीए सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण भाग आणि पायाभूत सुविधांवर भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रसरकारने 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचं उद्दिष्ट्य ठेवलं आहे, त्या दृष्टीकोनातून 2022 पर्यंत प्रत्येक गरीबाला घर देण्याचा सरकारचं लक्ष्य असणार आहे, अशी घोषणा जेटलींनी केली.
गेल्या तीन वर्षापासून सरकार गरीब आणि मध्यम वर्गाला केंद्रस्थानी ठेऊन काम करत आहे असं जेटली म्हणाले. 2022 पर्यंत प्रत्येक गरीबाला घर देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 1 कोटी पेक्षा जास्त घरे बांधली जात आहेत. आतापर्यंत 51 लाख घरं बांधली असून येत्या वर्षातही 51 लाख घरं बांधणार असल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या वर्षात बांधण्यात येणा-या 51 लाख घरांपैकी 36 लाख घरं शहरात बांधणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
2022 तक हर गरीब के पास होगा उसका अपना घर: वित्त मंत्री @arunjaitley#NewIndiaBudget#BudgetWithDDNews#Budget2018pic.twitter.com/LIY7GgS0AD
— दूरदर्शन न्यूज़ (@DDNewsHindi) February 1, 2018
2018-19 मध्ये देशात 2 कोटी शौचालय बनविण्याचं लक्ष्य ठेवण्यात आल्याची घोषणाही त्यांनी केली. ग्रामीण भागात पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी 14.34 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रासाठी 1 लाख कोटींचा निधी खर्च करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.