अर्थसंकल्प २0१८ : ‘विकास पुरुष’ ते ‘गरिबांचा नेता’, नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 01:44 AM2018-02-03T01:44:31+5:302018-02-03T01:44:53+5:30
नरेंद्र मोदी यांनी २0१४ मध्ये स्वत:ला ‘विकास पुरुष’ म्हणून देशासमोर उभे करून लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या होत्या. आता त्याच मोदी यांची २0१९ च्या निवडणुकीआधी त्यांना ‘गरिबांचा नेता’ म्हणून प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पावरून दिसत आहे.
नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांनी २0१४ मध्ये स्वत:ला ‘विकास पुरुष’ म्हणून देशासमोर उभे करून लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या होत्या. आता त्याच मोदी यांची २0१९ च्या निवडणुकीआधी त्यांना ‘गरिबांचा नेता’ म्हणून प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पावरून दिसत आहे.
राहुल गांधी यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष असताना २0१५ मध्ये नरेंद्र मोदींवर ‘सूट-बूट की सरकार’ अशी टीका केली होती. त्यातच बिहारची निवडणूकही भाजपला गमवावी लागली होती, तेव्हापासूनच मोदींनी स्वत:ची गरिबांचा नेता म्हणून प्रतिमा तयार करण्याचे ठरवले, असे जाणवते. तेव्हापासून मोदींनी स्वत:ला मोठ्या उद्योगपतींपासून दूर ठेवले.
आगामी निवडणुकीत ‘गरिबांचा नेता’ म्हणूनच मोदी जनतेला सामोरे जाणार आहेत, असे स्पष्ट संकेत वित्तमंत्री जेटली यांनी अर्थसंकल्पीय भाषणात दिले. सूत्रांनी सांगितले की, मोदींनी दिलेले नोकºयांचे आश्वासन २0१९ च्या आत पूर्ण करणे अशक्य आहे. त्यामुळे देशाचा मध्यमवर्ग नाराज आहे. शेती संकटात असल्यामुळे ग्रामीण भाग नाराज आहे. या परिस्थितीत ‘गरिबांचे नेता’ अशी प्रतिमा उभी करणे मोदींसाठी आवश्यक होते. ही प्रतिमा तयार करण्यासाठी मोदींनी पाच कलमी कार्यक्रम आखला आहे. त्यातील एक आहे उज्ज्वला योजना, तर दुसरी आहे सौभाग्य योजना. याद्वारे गरिबांच्या घरात गॅस सिलिंडर व वीज जोडणी दिली जात आहे. तिसरी आहे स्वच्छ भारत योजना ज्यात गरिबांना मोफत शौचालय बांधून दिली जातील. चौथी योजना ही शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील गरिबांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देते. पाचवी आणि सर्वांत महत्त्वाकांक्षी योजना सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर केली. ती म्हणजे आरोग्य संरक्षण योजना. ‘ओबामा केअर’च्या धर्ती हिला ‘मोदी केअर’ म्हटले गेले आहे.
निवडणुकीची पंचसूत्री
सूत्रांच्या मते, गरिबांच्या घरात गॅस सिलिंडर, वीज कनेक्शन,घरापाशी स्वच्छतागृहे, परवडणारी घरे आणि आरोग्य कवच या पाच सूत्रांच्या आधारे मोदी २0१९ च्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.