Budget 2018 : रेल्वेसाठी 1 लाख 48  हजार कोटी,  सुरक्षित प्रवासासाठी नवी योजना 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 12:45 PM2018-02-01T12:45:26+5:302018-02-01T12:47:14+5:30

यापूर्वी वेगळा मांडला जाणारा रेल्वे अर्थसंकल्प गेल्या वर्षापासून एकत्रीत मांडण्यात येत आहे. त्यानुसार आज अर्थसंकल्पात अरूण जेटलींनी रेल्वेच्या विकासासाठी वर्षभरात 1 लाख 48 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा केली.

Budget 2018: Rs 1.8 lakh crore for the Railways, new scheme for safe train travel | Budget 2018 : रेल्वेसाठी 1 लाख 48  हजार कोटी,  सुरक्षित प्रवासासाठी नवी योजना 

Budget 2018 : रेल्वेसाठी 1 लाख 48  हजार कोटी,  सुरक्षित प्रवासासाठी नवी योजना 

Next

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली 2018-19साठीचा अर्थसंकल्प आज (गुरुवार) सादर करत आहेत.  यापूर्वी वेगळा मांडला जाणारा रेल्वे अर्थसंकल्प गेल्या वर्षापासून एकत्रीत मांडण्यात येत आहे. त्यानुसार आज अर्थसंकल्पात अरूण जेटलींनी रेल्वेच्या विकासासाठी वर्षभरात 1 लाख 48 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा केली. तसंच देशभरात 6००  रेल्वेस्थानकांचं आधुनिकीकरण केलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली. 'राष्ट्रीय रेल्वे संरक्षण कोष' या योजनेंतर्गत प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी नवी योजना लागू करणार असल्याची घोषणा केली.
 ठळक मुद्दे -
- भारतीय रेल्वेसाठी 2018-2019 मध्ये 1.48 लाख कोटी खर्च करणार. 
- बंगळुरुमध्ये सबअर्बन रेल्वे इन्फासाठी 17 हजार कोटी रुपयांची घोषणा. 
- लवकरच सर्व रेल्वेमध्ये मोफत वाय-फाय सुविधा आणि सीसीटीव्ही देखील येणार. 
- येत्या 2 वर्षांमध्ये मानवरहित 4267 रेल्वे क्रॉसिंग बंद केले जाणार.
- 3600 किलोमीटरचे ट्रॅक नव्याने तयार करण्याची सरकारची योजना.
- मुंबईत ११ हजार कोटी रुपये खर्चून ९० किमी रेल्वे ट्रॅकचं दुहेरीकरण करणार
- देशभरात 6००  रेल्वेस्थानकांचं आधुनिकीकरण, 
- रेल्वे रूळ दुरुस्तीचं मोठं काम
- ४ हजार किमी रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचं कामही पूर्ण करणार
 - १८ हजार किमी रेल्वे मार्गांचं दुहेरीकरण करण्याचं काम प्रगतीपथावर
 - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी बडोद्यात प्रशिक्षित कर्मचारी तयार करण्याचं काम सुरू 

Web Title: Budget 2018: Rs 1.8 lakh crore for the Railways, new scheme for safe train travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.