budget 2018 : शिक्षणाच्या समग्र विचाराचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 04:14 AM2018-02-02T04:14:18+5:302018-02-02T04:14:36+5:30
वित्तमंत्र्यांनी अंदाजपत्रकात शिक्षण क्षेत्राचा समग्र विचार करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते आहे. शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रासाठीच्या निधीसाठी मागच्या वर्षी या क्षेत्रासाठी तरतूद केलेल्या निधीपेक्षा १३ टक्क्यांपेक्षा जास्त रकमेची तरतूद केलेली आहे.
- दिलीप फडके
वित्तमंत्र्यांनी अंदाजपत्रकात शिक्षण क्षेत्राचा समग्र विचार करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते आहे. शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रासाठीच्या निधीसाठी मागच्या वर्षी या क्षेत्रासाठी तरतूद केलेल्या निधीपेक्षा १३ टक्क्यांपेक्षा जास्त रकमेची तरतूद केलेली आहे.
एक लाख कोटींचा निधी शिक्षण क्षेत्राच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी दिला आहे. मुळात नर्सरी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा तुकड्यातुकड्याने विचार न करता समग्रपणे विचार करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केलेला आहे. पारंपरिकऐवजी डिजिटल शिक्षण पद्धतीचा वापर अधिक व्हावा यासाठीचे प्रयत्न होणार आहेत, त्यामुळे शिक्षणाचे आधुनिकीकरण शक्य आहे. २०२२पर्यंत नवोदय विद्यालयासारखी एकलव्य विद्यालये ज्या जिल्ह्यात ५१ टक्के जनता अनुसूचित जमातीची आहे तिथे काढली जाणार आहेत. त्यांचा लाभ अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. उच्च शिक्षणाच्या स्तरावर दरवर्षी बी. टेकच्या एक हजार विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी शिष्यवृत्ती देण्याची योजना तसेच वास्तुरेखा आणि नियोजन या विषयासाठीच्या दोन राष्ट्रीय स्तरावरच्या संस्थांच्या स्थापनेचा किंवा अठरा नव्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांच्या स्थापनेचा निर्णयदेखील जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्थांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा ठरू शकेल.
आता शिक्षणाचे धोरण एकच
शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी १३ लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची
योजना.
डिजिटल शिक्षण देण्याची योजना. आदिवासींच्या मुलांना शिक्षण
देण्यासाठी एकलव्य शाळा सुरू होणार.
प्री-नर्सरी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाचं धोरण एकच राहणार. देशातील शिक्षणावर १ लाख कोटी खर्च करणार.
१00000
कोटी रुपयांचा निधी शिक्षणाच्या क्षेत्रात खर्च करणार
पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेतून
१000
बी.टेक विद्यार्थ्यांची निवड होणार
शिक्षणासाठी सरकारने केली मोठी तरतूद
आगामी चार वर्षांमध्ये शिक्षणासाठी १ लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाणार असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात जाहीर केले. येत्या वर्षामध्ये देशभरात २४ नवीन मेडिकल कॉलेजची उभारणी करण्याची तसेच जिल्हा रुग्णालयांचा दर्जा वाढविण्याची घोषणाही त्यांनी केली.
देशाच्या शिक्षण क्षेत्राची पायाभूत बांधणी भक्कम करण्यासाठी येत्या चार वर्षांमध्ये १ लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. हे पैसे प्रत्येक वर्षी २५ टक्के दिले जातील, असेही अर्थमंत्र्यांनी जाहीर केले.
येत्या वर्षभरामध्ये देशभरात २४ नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार असल्याचेही जेटली यांनी आपल्या भाषणात सांगितले. याशिवाय देशातील जिल्हा रुग्णालयांचा दर्जा वाढवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवोदय विद्यालयांच्या धर्तीवर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एकलव्य आदर्श माध्यमिक शाळा सुरू करºयात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.