Budget 2019 For Small Bussiness: MSME साठी 59 मिनिटांत 1 कोटीचं कर्ज; अर्थसंकल्पात मोठी तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 12:54 PM2019-07-05T12:54:10+5:302019-07-05T12:58:25+5:30
अर्थसंकल्पात लहान दुकानदारांसाठीही पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी मोदी सरकार 2.0 चा पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासोबतच, इतरही अनेक क्षेत्रांसाठी भरीव निधी आणि संधी उपलब्ध करुन देण्याची तरतूद या अर्थसंकल्पात असल्याचे सितारमण यांनी सांगितले. समाजातील सर्वच घटकांसाठी हा अर्थसंकल्प फायदेशीर असल्याचेही सितारमण यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्पात शिक्षण, व्यापार, उद्योगांवरही भर देण्यात आला आहे.
अर्थसंकल्प 2019 Update :
अर्थसंकल्पात लहान दुकानदारांसाठीही पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. तसेच केवळ 59 मिनिटांत लघुउद्योग अन् दुकानादारांसाठी कर्जसुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी घोषणाही सितारमण यांनी केली. देशातील 3 कोटींपेक्षा अधिक दुकानदारांना या योजनेचा लाभ होणार आहे. वय वर्षे 18 ते 40 मधील तरुण या योजनेचा लाभ घेऊ शकतील. देशातील 3.25 लाख सेवा केंद्रावर यासाठी नोंदणी करता येईल. त्यासाठी MSME म्हणजेच मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्रायजेसअंतर्गत सरकारने 350 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. अर्थमंत्रालयाचे उद्धिष्ट हे रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म आहे, असेही सितारमण यांनी सांगितले.
केंद्रीय बजट 2019 सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यमों के लिए नई उम्मीद लेकर आया है, जीएसटी-पंजीकृत एमएसएमई के लिए आवंटित 350 करोड़ हैं.@nsitharaman@FinMinIndia#UnionBudget2019#BudgetForNewIndiapic.twitter.com/xQb2WJqOyu
— दूरदर्शन न्यूज़ (@DDNewsHindi) July 5, 2019