Budget 2020 : वीज मीटर प्रीपेड होणार, कंपनी आणि दर निवडण्याचा पर्याय असणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 02:23 PM2020-02-01T14:23:32+5:302020-02-01T14:36:57+5:30
वीज मीटर प्रीपेड करण्यात येणार असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली आहे.
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पातून करदात्यांना दिलासा देण्यात आला आहे. तसेच शेती, उद्योग आणि शिक्षणामध्ये भरीव तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात वीज मीटर प्रीपेड करण्यात येणार असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरद्वारे कंपनी आणि दर निवडण्याचा पर्याय आता असणार आहे. विद्युत विभागासाठी 22 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. देशभरात प्रीपेड मीटर लावण्यात येणार आहेत.
देशातील जुने मीटर हे या योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने हटवण्यात येणार आहेत. स्मार्ट मीटरमधून वीज सप्लाय करण्यात येणार असून यात वीजेचा दर निवडण्याचा पर्याय असणार आहे. यासाठी 22 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. 'पुढच्या तीन वर्षात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये जुने मीटर बदलून त्याजागी नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर हे लावण्यात येण्याचा मानस आहे' अशी माहिती सीतारामन यांनी दिली आहे.
मध्यमवर्गाला मोठा दिलासा; १० लाखांपर्यंत आयकरात मोठी सूटhttps://t.co/IAJkV2HiI9#Budget2020#IncomeTax
— Lokmat (@MiLOKMAT) February 1, 2020
वीजेच्या प्रीपेड मीटरवर केंद्र सरकार आधीपासून काम करत आहे. 2018 मध्ये याबाबत माहिती दिली होती. 2022 पर्यंत सर्व मीटर बदलण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. प्रीपेडमध्ये प्रीपेड नंबर आणि डिश टीव्हीचं सर्वप्रथम रिचार्ज करावा लागणार आहे. त्यानंतर सुविधा दिली जाते. नव्या धोरणामुळे वीज क्षेत्रात क्रांती घडणार आहे. वीज कंपन्याचे होणारे नुकसान कमी होणार असून कंपन्यांना फायदा होणार असल्याची माहिती मिळत आहे. सामान्यत: वीज वापरल्यानंतर त्याचं बिल येतं मात्र प्रीपेडमध्ये आधी रिचार्ज करा त्यानंतर वीजेचा वापर करता येणार आहे.
Budget 2020 Income Tax : इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलले अन् कररचनाही https://t.co/1m73TsWgUt
— Lokmat (@MiLOKMAT) February 1, 2020
अर्थसंकल्पातून करदात्यांना दिलासा देण्यात आला आहे. करदात्यांच्या कररचनेत बदल करण्यात आलेला आहे. पाच ते साडेसात लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना फक्त 10 टक्के कर आकारला जाणार आहेत. 5 ते 7.5 लाखदरम्यान करपात्र उत्पन्न असणाऱ्यांना 10 टक्के कर वसूल केला जाणार आहे. तर 7.50 ते 10 लाखांसाठी 15 टक्के कर आकारला जाणार आहे. तसेच 10 ते 12.5 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांकडून 20 टक्के कर आकारला जाणार आहे. ज्यांचं वार्षिक उत्पन्न 12.5 ते 15 लाख आहे, त्यांच्याकडून 25 टक्के कर आकारला जाणार आहे. वार्षिक उत्पन्न 15 लाखांहून अधिक असणाऱ्यांकडून 30 टक्के प्राप्तिकर आकारला जाणार आहे.
2023 पर्यंत सरकारकडे 1200 विमाने असणार https://t.co/0SWMcnB6NC#Budget2020#BudgetSession2020pic.twitter.com/C8YOs6MLHl
— Lokmat (@MiLOKMAT) February 1, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Budget 2020 Income Tax : इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलले अन् कररचनाही; अर्थमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
Budget 2020 : सरकार एलआयसीमधील आपली भागीदारी विकणार, अर्थसंकल्पामधून मोठी घोषणा
Budget 2020: मोदी सरकार मुलींच्या लग्नाचं वय बदलणार? निर्मला सीतारामन यांनी दिले संकेत
Budget 2020 : मोदी सरकारचे 'उड्डाण'; देशभरात 100 विमानतळ कार्यरत करणार
Budget 2020: शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारच्या १६ मोठ्या घोषणा