Budget 2020: सीतारामन यांच्या नावावर नवा विक्रम; ९१ अर्थसंकल्पांमध्ये कोणालाही जमला नव्हता!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 04:50 PM2020-02-01T16:50:38+5:302020-02-01T16:52:23+5:30

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २ तास ३९ मिनिटं भाषण केलं

Budget 2020 Nirmala Sitharaman sets new record with longest Budget speech ever | Budget 2020: सीतारामन यांच्या नावावर नवा विक्रम; ९१ अर्थसंकल्पांमध्ये कोणालाही जमला नव्हता!

Budget 2020: सीतारामन यांच्या नावावर नवा विक्रम; ९१ अर्थसंकल्पांमध्ये कोणालाही जमला नव्हता!

Next

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत बजेट सादर केलं. सकाळी ११ वाजता सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात केली. त्यांनी अडीच तासांपेक्षा जास्त वेळ भाषण केलं. गेल्या काही वर्षांमध्ये अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा कालावधी वाढताना दिसत आहे. दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या भाषणाचा कालावधीदेखील जास्त होता. सीतारामन यांनी आज २ तास ३९ मिनिटं भाषण केलं. त्यामुळे सर्वाधिक मोठं अर्थसंकल्पीय भाषण दिल्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा झाला. 

२००३ मध्ये जसवंत सिंह यांनी अर्थसंकल्प मांडला. त्यावेळी त्यांनी २ तास १३ मिनिटं भाषण केलं होतं. जसवंत सिंह यांचा विक्रम निर्मला सीतारामन यांनी मोडीत काढला. गेल्या ७३ वर्षांमध्ये ९१ अर्थसंकल्प सादर झाले. या ७३ वर्षांमधलं सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण आज सीतारामन यांना दिलं. मात्र तरीही सीतारामन यांना शेवटची दोन पानं वाचता आली नाहीत. प्रकृती फारशी ठीक नसल्यानं निर्मला यांनी दोन पानं वाचणं टाळलं. सलग दोनवेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला अर्थमंत्री ठरल्या. याआधी इंदिरा गांधींनी सलग दोनदा अर्थसंकल्प मांडला आहे. 

सर्वाधिक वेळ भाषण करणारे अर्थमंत्री
निर्मला सीतारामन- २ तास ३९ मिनिटं (२०२०)
जसवंत सिंह- २ तास १३ मिनिटं (२००३)
अरुण जेटली- २ तास १० मिनिटं (२०१४)
निर्मला सीतारामन- २ तास ५ मिनिटं (२०१९)

शब्दांच्या बाबतीत सर्वात मोठं भाषण
मनमोहन सिंग- १८,६५० शब्द (१९९१)
अरुण जेटली- १८,६०४ शब्द (२०१७)
अरुण जेटली- १८,१२२ शब्द (२०१५)
अरुण जेटली- १७,९९१ शब्द (२०१८)
अरुण जेटली- १७,५२८ शब्द (२०१४)
 

Web Title: Budget 2020 Nirmala Sitharaman sets new record with longest Budget speech ever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.