Budget 2020 : ....म्हणून अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता केला जातो सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 09:54 AM2020-02-01T09:54:13+5:302020-02-01T09:54:44+5:30
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या वर्षी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. देशावर असलेलं मंदीचं सावट हे या अर्थसंकल्पासमोरील महत्त्वाचं आव्हान असणार आहे. इनकम टॅक्समध्ये काही बदल होतात का? याकडे मध्यमवर्गीयांचे लक्ष लागलं आहे. ग्रामीण, कृषी क्षेत्रासाठी मोदी सरकार कोणत्या नवीन योजना आणणार का? हे पाहणं गरजेचे आहे. सकाळी 11 च्या सुमारास लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात होते. मात्र अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ सकाळी 11 वाजता का असते यामागचं नेमकं कारण जाणून घेऊया.
काही वर्षापूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सादर केला जात होता. त्यामागे विशेष कारण होतं. भारतीय अर्थसंकल्पाच्या इतिहासात अशा काही घटनांची नोंद आहे. मोदी सरकारच्या काळात अर्थसंकल्पाच्या काही परंपरा बदलल्या गेल्या. पूर्वी अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम आठवड्यात मांडला जात होता. जो बदलून 1 फेब्रुवारी निश्चित करण्यात आला. त्याचसोबत रेल्वे अर्थसंकल्प संपवून त्याचा समावेश सामान्य अर्थसंकल्पात केला जाऊ लागला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री आणि त्यांच्या टीमने घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट #Budget2020#Livehttps://t.co/IAJkV2HiI9
— Lokmat (@MiLOKMAT) February 1, 2020
2001 मध्ये पहिल्यांदा सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडला गेला. तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी तो अर्थसंकल्प सादर केला होता. त्याआधी अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सादर केला जात होता. संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा ब्रिटिश राजवटीपासून सुरु होती. मात्र 2001 मध्ये यशवंत सिन्हा यांनी ही परंपरा बदलून सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची नवीन परंपरा सुरू केली. त्यावेळी देशात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार होतं.
जेव्हा देशावर इंग्रजांचे शासन होतं. त्यावेळी संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प सादर करण्यामागे एक कारण होतं. त्यावेळी शासन व्यवस्था ब्रिटीश वेळेप्रमाणे चालत होती. ब्रिटनमध्ये सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर होत होता त्यात भारताच्या अर्थसंकल्पाचा समावेश होता. अर्थसंकल्प भारताच्या संसदेत पास होणं गरजेचे होते. म्हणून ब्रिटनमध्ये सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भारतात तो संध्याकाळी 5 वाजता सादर केला जात होता.
सोशल मिडीयावर प्रश्नांच्या फैरी... व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचाही दिला सल्लाhttps://t.co/AGxGz9aBJW#Budget2020#BudgetSession2020
— Lokmat (@MiLOKMAT) February 1, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Budget 2020 Live Updates: मोदी सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर होणार; महाराष्ट्राला काय मिळणार?
चीनमध्ये अडकलेले 324 विद्यार्थी एअर इंडियाच्या विशेष विमानाने दिल्लीत दाखल
...म्हणून मी कोणत्याही थराला जायचं ठरवलं होतं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला मोठा खुलासा