Budget 2021, Agriculture : 'मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी वचनबद्ध, गहू उत्पादकांना ७५,०६० कोटींची मदत!' 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 01:01 PM2021-02-01T13:01:54+5:302021-02-01T13:17:01+5:30

Budget 2021 Latest News and updates: निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी वचनबद्ध असून शेतमालाला दीडपट हमीभाव देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

Budget 2021, Agriculture: 'Modi government committed for the benefit of farmers, provision of assistance of Rs 75,060 crore to wheat growers!' | Budget 2021, Agriculture : 'मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी वचनबद्ध, गहू उत्पादकांना ७५,०६० कोटींची मदत!' 

Budget 2021, Agriculture : 'मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी वचनबद्ध, गहू उत्पादकांना ७५,०६० कोटींची मदत!' 

Next

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करत असून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. एकीकडे नव्या कृषी कायद्यांबाबत दिल्लीच्या सीमेवर शेतकरी  आंदोलन करत आहे. याच पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी वचनबद्ध असून शेतमालाला दीडपट हमीभाव देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. (Budget 2021 Latest News and updates)

संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांचा उल्लेख करताच विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली. निर्मला सीतारामन म्हणाल्या, "आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी वचनबद्ध आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव देण्यासाठी प्रयत्नशील आहे. गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीकरता तरतूद करण्यात आली. गव्हाचे उत्पादन घेणाऱ्या ४३ लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे."

सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने काम करत आहे. मागील यूपीए सरकारपेक्षा मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये तीनपट निधी पोहोचला आहे. तसेच, सरकारकडून प्रत्येक सेक्टरमधून शेतकऱ्यांना मदत केली जात आहे. डाळी, गहू, धान आणि इतर पिकांचा एमएसपी वाढविला आहे, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

याचबरोबर, २०१२ मध्ये शेतकऱ्यांना किमान हमीभावापोटी ३३ हजार कोटी रुपये दिले होते, २०१५ मध्ये शेतकऱ्यांना ५२ हजार कोटी रुपये दिले तर २०२०-२१ मध्ये हा आकडा ७५ हजार कोटी वाढला आहे. याशिवाय, देशभरात आता स्वामित्व योजना राबविली जाणार आहे. शेतीचे क्रेडिट टारगेट १६ लाख कोटीपर्यंत केले जात आहे. तसेच, ऑपरेशन ग्रीन स्कीम जाहीर करण्यात आली असून यामध्ये बऱ्याच पिकांचा समावेश करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असेही निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची सुरूवात, ८० कोटी लोकांना फायदा : अर्थमंत्री

दरम्यान, कोरोनामुळे देशाच्या आरोग्य क्षेत्राची जाणीव आपल्याला करुन दिली. त्यामुळेच, यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला भरभरुन देण्यात आले आहे. आरोग्य खात्याच्या अर्थसंकल्पात तब्बल १३७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात ३५ हजार कोटी रुपये कोरोना लसीकरणासाठी देण्यात आले असून गरज भासल्यास आणखी निधी देण्यात येईल, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. यंदा आरोग्य खात्यासाठी तब्बल २ लाख ३२ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर होत आहे. गेल्या वर्षीचा आरोग्य खात्याचा अर्थसंकल्प हा ९२ हजार कोटी रुपयांचा होता. म्हणजेच, यंदाच्या बजेटमध्ये तब्बल १३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Web Title: Budget 2021, Agriculture: 'Modi government committed for the benefit of farmers, provision of assistance of Rs 75,060 crore to wheat growers!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.