Budget 2021: बंगाल निवडणुकीवर लक्ष?; जेव्हा सितारमण यांनी केला टागोरांच्या ओळीचा उल्लेख, विश्वास एक असा पक्षी आहे...
By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 1, 2021 01:04 PM2021-02-01T13:04:52+5:302021-02-01T13:09:19+5:30
सीतामरण म्हणाल्या 'इतिहासातील हा क्षण एका नव्या युगाची पाहाट आहे, यात भारत एक आशेची भूमी बनण्याकडे वाटचाल करत आहे.'
नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या काळातच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचे पहिले पेपरलेस बजेट सादर केले. यावेळी त्यांनी नोबेल पुरस्कार विजेते कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या एका ओळीचाही उल्लेख केला. कोरोनाविरोधातील भारताच्या लढाईचा उल्लेख करत सीतारमण म्हणाल्या, "मी रवींद्रनाथ टागोर यांच्या एका ओळीचा उल्लेख कत आहे, ते म्हणाले होते, 'Faith is the bird that feels the light and sings when the dawn is still dark." अर्थात "विश्वास एक असा पक्षी आहे, जो पहाटेच्या अंधकारातही प्रकाश अनुभवतो आणि गातो." रविंद्रनाथ टागोर हे मुळचे बंगालचे होते आणि आगामी काळात बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत.
निवडणुकीपूर्वीच पश्चिम बंगालला गिफ्ट, महामार्गांसाठी 25 हजार कोटींची घोषणा -
सरकारने बंगालमध्ये महामार्गांसाठी 25 हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. या राष्ट्रीय महामार्गांची लांबी 675 किलोमीटर एवढी असणार आहे. याशिवाय बजेटमध्ये सीतारमण यांनी कोलकाता-सिलीगुडी महामार्गाचेही अपग्रेडेशन करण्याची घोषणा केली आहे. सध्या बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही राजकीय वातावरण तापलेले आहे.
Budget 2021 Live : वाहनांचे सुटे भाग महागणार; 'स्वदेशी' मोबाईल स्वस्त होणार
इतिहासातील हा क्षण एका नव्या युगाची पाहाट -
यावेळी बोलताना सीतामरण म्हणाल्या 'इतिहासातील हा क्षण एका नव्या युगाची पाहाट आहे, यात भारत एक आशेची भूमी बनण्याकडे वाटचाल करत आहे.' त्या म्हणाल्या, कोरोना संकट काळात केंद्र सरकारने गरिबांना शक्य ती सर्व मदत केली. कोरोना काळात सरकारने छोट्या आणि मध्यम उद्योगांनाही मदत केली. 'आत्मनिर्भर भारत'अंतर्गत एकूण 27.1 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जारी करण्यात आले. या महामारीमुळे जागतीक अर्थव्यवस्थेत अभूतपूर्व मंदी आली. असे असतानाही भारताने फार चांगल्याप्रकारे काम केले आहे.
35 हजार कोटी रुपये कोरोना लसीकरणासाठी -
कोरोनाने आपल्या देशाच्या आरोग्य क्षेत्राची जाणीव करून दिली. यामुळेच, यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला भरभरून देण्यात आले आहे. आरोग्य खात्याच्या अर्थसंकल्पात तब्बल 137 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात 35 हजार कोटी रुपये कोरोना लसीकरणासाठी देण्यात आले असून गरज भासल्यास आणखी निधी देण्यात येईल, असे निर्मला सितारमण यांनी सांगितले. यंदा आरोग्य खात्यासाठी तब्बल 2 लाख 32 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर होत आहे. गेल्या वर्षीचा आरोग्य खात्याचा अर्थसंकल्प हा 92 हजार कोटी रुपयांचा होता. म्हणजेच, यंदाच्या बजेटमध्ये तब्बल 137 टक्क्यांनी वाढ झाली आहे.