Budget 2021 Live : वाहनांचे सुटे भाग महागणार; 'स्वदेशी' मोबाईल स्वस्त होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 09:50 AM2021-02-01T09:50:43+5:302021-02-01T16:24:03+5:30

Budget 2021 Live Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन Nirmala Sitharaman ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर केला. कोरोनामुळे खंक झालेल्या अर्थव्यवस्थेला ...

Budget 2021 Live: Finance Minister Nirmala Sitharaman present budget by 'Made in India' tab | Budget 2021 Live : वाहनांचे सुटे भाग महागणार; 'स्वदेशी' मोबाईल स्वस्त होणार

Budget 2021 Live : वाहनांचे सुटे भाग महागणार; 'स्वदेशी' मोबाईल स्वस्त होणार

Next

Budget 2021 Live Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन Nirmala Sitharaman ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर केला. कोरोनामुळे खंक झालेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी रोजगारनिर्मितीला चालना देण्याबरोबरच सामान्यांना प्राप्तिकरात सवलती, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ, आरोग्य क्षेत्राला उभारी, उद्योगांना भरघोस सवलती इत्यादींसाठी सर्वंकष तरतुदी करण्याची आवश्यकता भासणार असून आज, १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून याच अपेक्षा असतील. टाळेबंदीने आक्रसलेला रोजगाराचा बाजार आर्थिक लसीच्या प्रतीक्षेत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनीची अपेक्षा आहे. आरोग्य क्षेत्रही बूस्टरच्या अपेक्षेत आहे.  तर उद्योगांना सवलतींची आवश्यकता आहे. इंधनदर रोज नवे विक्रम स्थापित करत असल्याने महागाईने मेटाकुटीला आलेल्या जनतेला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 

02:24 PM

टॅक्स टेररिझम संपविणारे बजेट : देवेंद्र फडणवीस

"नाशिक मेट्रोचे मॉडेल स्वीकारले ही आनंदाची बाब"; फडणवीसांकडून नागपूर, नाशिककरांचं अभिनंदन

02:21 PM

नागपूर आणि नाशिकला भाजपाची सत्ता राहणार नाही. मुंबईची मेट्रो का रखडवली आहे? : राऊत

नागपूर आणि नाशिकला भाजपाची सत्ता राहणार नाही. मुंबईची मेट्रो का रखडवली आहे? केंद्राची जमीन आहे म्हणता, मंगळावरून आणली का चंद्रावरून. पेट्रोल हजार रुपये लीटर करून कायमचं मारायचं आहे. सामान्य जनतेला पोटाची भाषा कळते, तरुणांना रोजगाराची भाषा कळते.

02:19 PM

आकड्यात पडायचं नाही, किती खरे-किती खोटे हे सहा महिन्यांनी कळतं : संजय राऊत

हा अर्थसंकल्प देशासाठी आहे की राजकीय पक्षाच्या निधीवाटपाचा. राष्ट्रीय कोषातून निवडणुकांसाठी निधीवाटप सुरू आहे का? संजय राऊत

02:19 PM

Budget 2021, Automobile sector: मोठी बातमी! डिझेलवर 4, पेट्रोलवर 2.5 रुपयांचा कृषी सेस; महागाईचा भडका उडणार?

मोठी बातमी! डिझेलवर 4, पेट्रोलवर 2.5 रुपयांचा कृषी सेस; महागाईचा भडका उडणार?

 

12:52 PM

ऑटो स्पेअर पार्टसवर कस्टम ड्युटी वाढवून 15 टक्के करण्यात आली आहे. यामुळे स्पेअर पार्ट महागणार आहेत.

ऑटो स्पेअर पार्टसवर कस्टम ड्युटी वाढवून 15 टक्के करण्यात आली आहे. यामुळे स्पेअर पार्ट महागणार आहेत. 

12:50 PM

स्टार्टअप्सना आणखी एक वर्ष करातून सूट. 

स्टार्टअप्सना आणखी एक वर्ष करातून सूट. 
स्वस्त घरांसाठी 1.5 लाख रुपयांच्या कर्जाच्या व्याजावर सूट आणखी एक वर्ष वाढविली. 
| जुन्या कर प्रकरणातल्या तपासासाठी 6 ऐवजी 3 वर्षांचे रेकॉर्ड तपासणार : अर्थमंत्री

12:45 PM

आयडीबीआय बँकेसह सार्वजनिक क्षेत्रातील अन्य दोन बँका विकणार

आयडीबीआय बँकेसह सार्वजनिक क्षेत्रातील अन्य दोन बँका विकणार. कोरोनामुळे खर्च वाढत चालल्याने निर्णय.

12:43 PM

कर परताव्यावर मोठ्या घोषणा

कर परताव्यावर टीडीएस कापला जाणार नाही. लाभांशावरही टीडीएस नाही. अनिवासी भारतीयांना दुहेरी कर नाही. 



 

12:31 PM

पुढील जनगणना डिजिटल होणार. : अर्थमंत्री

खोल समुद्रतील संशोधनासाठी 4000 कोटी. 
मानवरहित गगणयानाचे उड्डाण डिसेंबरमध्ये होणार. 
चहा कामगारांना एक हजार कोटी. 

12:31 PM

नवीन करप्रणालीला १.१ लाख करदात्यांचा प्रतिसाद.

नवीन करप्रणालीला १.१ लाख करदात्यांचा प्रतिसाद. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आयकरातून सूट. पेन्शन धारकांना आयकर परतावा भरावा लागणार नाही. ही सूट केवळ 75 वर्षे झालेल्या पेन्शनधारकांसाठीच आहे. 

12:18 PM

उज्ज्वला योजनेचा आणखी 1 कोटी लाभार्थ्यांना लाभ देणार. जम्मू काश्मीरमध्ये गॅस पाईपलाईन प्रोजेक्ट राबविणार.

उज्ज्वला योजनेचा आणखी 1 कोटी लाभार्थ्यांना लाभ देणार. जम्मू काश्मीरमध्ये गॅस पाईपलाईन प्रोजेक्ट राबविणार.



 

12:18 PM

महिलांसाठी मोठा निर्णय; नाईट शिफ्टही करता येणार : निर्मला सीतारामन

महिलांना सर्व श्रेणींमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नाईट शिफ्टमध्येही त्यांना काम करता येणार आहे. यासाठी सुरक्षाही प्रदान केली जाईल : निर्मला सीतारामन



 

12:13 PM

विमा कायदा १९३८ मध्ये बदल, FDI ७४ टक्क्यांवर - निर्मला सीतारामन



 

12:12 PM

शेतमालाला दीडपट हमीभाव देण्यासाठी सरकार प्रय़त्नशील. गहू उत्पादकांना 75 हजार 60 कोटींची मदत

शेतमालाला दीडपट हमीभाव देण्यासाठी सरकार प्रय़त्नशील. गहू उत्पादकांना 75 हजार 60 कोटींची मदत




 

12:02 PM

नवीन आर्थिक वर्षात एलआयसीचा आयपीओ आणणार.



 

11:56 AM

बँकांच्या बुडीत कर्जासाठी वेगळी कंपनी; वसुली करणारच : अर्थमंत्री

बँकांच्या बुडीत कर्जावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. बँकांच्या बुडीत कर्जे वेगळ्य़ा कंपनीत वळविणार आहेत; बुडीत कर्जांची वसुली करणार असल्याचे त्या म्हणाल्या. 

11:46 AM

नागपूर मेट्रोच्या फेज 2 साठी 5976 कोटी, नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटी रुपयांची तरतूद : अर्थमंत्री

नागपूर मेट्रोच्या फेज 2 साठी 5976 कोटी, नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटी रुपयांची तरतूद

11:44 AM

लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची सुरूवात, ८० कोटी लोकांना फायदा : अर्थमंत्री

लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची सुरूवात, ८० कोटी लोकांना फायदा : अर्थमंत्री

 

11:41 AM

ग्रामीण भागात जलजीवन मिशनसाठी 2.87 लाख कोटी रुपये पुढील पाच वर्षांसाठी खर्च होणार.

ग्रामीण भागात जलजीवन मिशनसाठी 2.87 लाख कोटी रुपये पुढील पाच वर्षांसाठी खर्च होणार. 

11:38 AM

मुंबई-कन्याकुमारी कॉरिडॉरची घोषणा

1100 किमी लांबीचा नॅशनल हायवे केरळमध्ये होणार. 65 हजार कोटींचा खर्च. मुंबई-कन्याकुमारी कॉरिडॉर याचा हिस्सा. 



 

11:36 AM

रस्ते वाहतुकीसाठी 1 लाख 18 हजार कोटी रुपये अर्थमंत्री

रस्ते वाहतुकीसाठी 1 लाख 18 हजार कोटी रुपये . रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी रेल्वे प्लॅन 2030 विचाराधीन.

11:34 AM

दुसऱ्या आणि तिसऱ्या टिअरच्या शहरांमध्ये गॅस पाईपलाईनचा विस्तार करणार

दुसऱ्या आणि तिसऱ्या टिअरच्या शहरांमध्ये गॅस पाईपलाईनचा विस्तार करणार 

11:33 AM

17 नवीन पब्लिक हेल्थ युनिट सुरु केले जाणार : निर्मला सीतारामन

17 नवीन पब्लिक हेल्थ युनिट सुरु केले जाणार. 32 विमानतळांवरही असणार. 9 बायोलॅब, चार नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी बांधणार.

11:22 AM

जुन्या वाहनांना भंगारात काढण्यासाठी व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी लवकरच. : निर्मला सीतारामन

जुन्या वाहनांना भंगारात काढण्यासाठी व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी लवकरच लागू करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. 

11:15 AM

Budget 2021: बजेटबद्दल या गोष्टी माहिती आहेत का? प्रत्येकाने नक्की जाणून घ्याव्यात...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली. यंदा मोठा बदल म्हणजे बहीखात्याऐवजी मेक इन इंडियाच्या टॅब्लेटद्वारे अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. असेच काही बदल आजवरच्या अर्थसंकल्पांमध्ये झाले आहेत. चला जाणून घेऊया... 

Budget 2021: बजेटबद्दल या गोष्टी माहिती आहेत का? प्रत्येकाने नक्की जाणून घ्याव्यात...

 

11:14 AM

कोरोना संकटात सरकारने 5 मिनी बजेट सादर केले : अर्थमंत्री निर्मला सीतारामन

कोरोना संकटात सरकारने 5 मिनी बजेट सादर केले. आरबीआयनेही 27 लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले : अर्थमंत्री निर्मला सीतारामन



 

10:52 AM

कृषी विधेयकांना विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेसचे दोन खासदार काळ्या वेषात


10:49 AM

अर्थसंकल्पाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी



 

10:19 AM

केंद्रीय मंत्री अमित शहा आणि डॉ. हर्ष वर्धन लोकसभेत दाखल.



 

10:05 AM

राष्ट्रपतींची स्वाक्षरी घेऊन अर्थमंत्री लोकसभेत दाखल



 

10:02 AM

यंदाचा अर्थसंकल्प राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आला. राष्ट्रपतींनी बजेट 2021 वर डिजिटल स्वाक्षरी केली.

यंदाचा अर्थसंकल्प राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आला. राष्ट्रपतींनी बजेट 2021 वर डिजिटल स्वाक्षरी केली. 



 

10:00 AM

यंदाचा अर्थसंकल्प 'हायटेक' होणार; बहीखात्याऐवजी टॅबवरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडणार



 

Web Title: Budget 2021 Live: Finance Minister Nirmala Sitharaman present budget by 'Made in India' tab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.