Budget 2021, Infrastructure: मुंबई-कन्याकुमारी कॉरिडोर; निर्मला सीतारामन यांची ११०० किमीच्या हायवेची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 11:57 AM2021-02-01T11:57:53+5:302021-02-01T11:59:34+5:30

Budget 2021 Indian Railway : रेल्वे डेडिकेटेड फ्रंट कॉरिडोर, NHAI टोल रोड, एअरपोर्ट असेट मॉनेटाइझेशन मॅनेजमेंटच्या अंतर्गत आणणार : अर्थमंत्री

Budget 2021 live Infrastructure Mumbai Kanyakumari Corridor Nirmala Sitharaman announces 1100 km highway railway dedicated front corridor | Budget 2021, Infrastructure: मुंबई-कन्याकुमारी कॉरिडोर; निर्मला सीतारामन यांची ११०० किमीच्या हायवेची घोषणा

Budget 2021, Infrastructure: मुंबई-कन्याकुमारी कॉरिडोर; निर्मला सीतारामन यांची ११०० किमीच्या हायवेची घोषणा

Next
ठळक मुद्देनॅशनल रेल्वे प्लॅन २०३० तयार करण्यात आल्याची अर्थमंत्र्यांची माहितीभारतमाला प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ३ हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे रस्ते तयार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२१ या वर्षांचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच टॅबच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वे डेडिकेटेड फ्रन्ट कॉरिडोअर, NHAI चे टोल रोड आणि एअरपोर्टसारख्या ठिकाणांना असेट मॉनिटायझेशन मॅनेजमेंटच्या अंतर्गत आणणार असल्याची घोषणा केली. तसंच यावेळी त्यांनी जुन्या गाड्यांना स्क्रॅप केलं जाणार असून त्यामुळे प्रदुषण नियंत्रणात येईल असं म्हटलं. यामुळे इंधनाची बचतही होईल. याव्यतिरिक्त ऑटोमेटेड फिटनेस सेंटर तयार करण्यात येणार असून खासगी गाड्या २० वर्षांनंतर या सेंटरमध्ये न्याव्या लागणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. 

"भारतमाला प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ३ हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. ८ हजार किलोमीटरपर्यंतचं कंत्राट मार्च महिन्यापर्यंत देण्यात येईल. रोड इन्फ्रा आणि इकॉनॉनिक कॉरिडोअरवर काम सुरू आहे. सध्या तामिळनाडूत ३ हजार ५०० किमीचे रस्ते तयार होत आहेत. यात मदुरै-कोल्लम कॉरिडोअरचादेखील समावेश आहे," असं सीतारामन म्हणाल्या.

"केरळमध्ये ११०० किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात येणार आहे. यासाठी ६५ हजार कोटी रूपये खर्च होतील. मुंबई कन्याकुमारी कॉरिडोअरदेखील याचाच भाग असेल. तर ६,५०० किलोमीटर लांबीचा महामार्ग बंगालमध्ये तयार केला जाईल. यावर २५ हजार कोटी रूपये खर्च केले जातील. यामध्ये कोलकाता-सिलिगुडी रस्त्याची डागडुजीही करण्यात येणार आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 


Budget 2021 live Infrastructure Mumbai Kanyakumari Corridor Nirmala Sitharaman announces 1100 km highway railway dedicated front corridor 
नॅशनल रेल्वे प्लॅन २०३० तयार करण्यात आला आहे. फ्युचर रेडी रेल्वे सिस्टम तयार करणं आमचं ध्येय आहे. यात सरकार मेक इन इंडियावर लक्ष केंद्रित करेल. वेस्टर्न आणि इस्टर्न फ्रेट कॉरिडोअर जून २०२२ पर्यंत पूर्ण होणार असल्याचंही सीतारामन म्हणाल्या. मागील अर्थसंकल्पामध्ये ४.२१ लाख कोटी कॅपिटल एक्सपेंडीचरसाठी देण्यात आले होते. यावेळी ४.३९ लाख कोटी रुपये खर्च केले जातील. पुढील वर्षासाठई ५.५४ लाख कोटी रूपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आल्याचंही सीतारामन म्हणाल्या.

 

Web Title: Budget 2021 live Infrastructure Mumbai Kanyakumari Corridor Nirmala Sitharaman announces 1100 km highway railway dedicated front corridor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.