Budget 2021 Live : मोबाईलच्या किंमती महागण्याची शक्यता; कस्टम ड्युटीत झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 01:46 PM2021-02-01T13:46:43+5:302021-02-01T13:50:27+5:30

Budget 2021 Live : वाहनांच्या सुट्या भागांवरहील कस्टम ड्युटीतही झाली वाढ, सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटीत घट

Budget 2021 Live Mobile prices likely to go up Increased custom duty says finance minister nirmala sitharaman | Budget 2021 Live : मोबाईलच्या किंमती महागण्याची शक्यता; कस्टम ड्युटीत झाली वाढ

Budget 2021 Live : मोबाईलच्या किंमती महागण्याची शक्यता; कस्टम ड्युटीत झाली वाढ

Next
ठळक मुद्देवाहनांच्या सुट्या भागांवरहील कस्टम ड्युटीतही झाली वाढसोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटीत घट

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी मोबाईलवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात आल्याची घोषणा केली. मोबाईल उपकरणांवर आता २.५ टक्क्यांपर्यंत कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात मोबाईलच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मोबाईल उपकरणांवर आता २.५ टक्के कस्टम ड्युटी लागू केली जाणार आहे. त्यानंतर आता मोबाईल आणि चार्जर महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक उपकरणंही महाग होण्याची शक्यता आहे. ऑटो पार्ट्सवरही कस्टम ड्युटी वाढवून ती १५ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांचे सुटे भाग महाग होण्याची शक्यता आहे. याशिवाय कॉपर आणि स्टीलवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. तर सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटीही कमी करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. १ ऑक्टोबर २०२१ पासून देशात हे लागू केलं जाणार आहे. दरम्या काही वस्तूंवर अॅग्रीकल्चरल सेसदेखील लावला जाणार असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

वित्तीय तूट ६.८ टक्क्यांवर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणादरम्यान वित्तीय तूट जीडीपीच्या ६.८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला. तसंच यासाठी सरकारला ८० हजार कोटी रूपयांची आवश्यकता भासणार आहे. ती रक्कम येत्या दोन महिन्यांमध्ये बाजारातून घेतली जाणार असल्याचंही अर्थमंत्री म्हणाल्या. याव्यतिरिक्त न्यू स्पेस इंडिया लिमिटेड यावेळी PSLV-CS51 लाँच करणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. गगनयान मिशनचं मानवरहित पहिलं लाँच याच वर्षी डिसेंबर महिन्यात होणार आहे. इज ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत टर्बियूनल तयार करण्यात येणार आहे. यात कंपन्यांची प्रकरणं लवकरात लवकर संपवली जातील. तसंच आगामी जनगणना पहिल्यांदा डिजिटली केली जाईल, असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं. 
 

Web Title: Budget 2021 Live Mobile prices likely to go up Increased custom duty says finance minister nirmala sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.