Budget 2021, Nirmala Sitharaman: मागे पडलेल्यांनी जिंकून दाखवलं; टीम इंडियाच्या पराक्रमाचं उदाहरण वित्तमंत्री देतात तेव्हा...
By स्वदेश घाणेकर | Published: February 1, 2021 01:41 PM2021-02-01T13:41:01+5:302021-02-01T13:41:40+5:30
Budget 2021 Latest News and updates: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी बजेट ( Budget 2021) सादर करताना भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा उल्लेख केला.
कोरोना व्हायरसमुळे २०२० हे वर्ष लॉकडाऊनमध्येच गेलं आणि त्यात प्रत्येकाचं आयुष्यच लॉक करून टाकलं, त्यावेळी क्रिकेटनं प्रत्येकाच्या आयुष्यात संजीवनीरुपी एन्ट्री घेतली. आपापल्या घरातच अडकून पडलेल्यांच्या चेहऱ्यावर सुरुवातीला इंडियन प्रीमिअर लीगनं ( IPL 2020) आणि त्यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेनं ( India vs Australia) हास्य फुलवले. ऑस्ट्रेलियातील मालिकेनं प्रत्येकाला आयुष्यातील खूप मोठा अन् महत्त्वपूर्ण अर्थ समजावून सांगितला. या मालिकेतील पहिल्या कसोटीत टीम इंडिया सर्वात निचांक धावसंख्येवर तंबूत परतली आणि त्यानंतर एकदम फिनिक्स भरारी घेताना २-१ अशा फरकाने मालिका जिंकली. त्यामुळेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी बजेट ( Budget 2021) सादर करताना भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा उल्लेख केला.
अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी सोमवारी बजेट सादर केला. त्यांनी यावेळी सांगितले की, मागील वर्ष हे सर्वांसाठी आव्हानात्मक ठरले. भारतीयांनी या संकटाचाही धैर्यानं सामना केला. भारताच्या अर्थव्यवस्थेवरही या संकटाचा परिणाम झाला, परंतु त्यातूनही आपण चांगले पुनरागमन केलं आहे. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानं भारतातील प्रत्येकाला त्यांच्यात असलेल्या ताकदीची आठवण करून दिली.''
अॅडलेड कसोटीत टीम इंडियाचा दुसरा डाव ३६ धावांत गडगडला होता. भारत ०-१ असा पिछाडीवर होता, परंतु संकटात असलेल्या टीम इंडियाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेनं सक्षमपणे सांभाळून सर्वांची मनं जिंकली. मेलबर्न कसोटीत खणखणीत शतक झळकावून त्यानं अन्य सहकाऱ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले. त्यानंतर युवा गोलंदाजांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहून त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेतली. रवींद्र जडेजामुळे धावबाद झाल्यानंतरही रागावण्याऐवजी अजिंक्य त्याच्याजवळ गेला आणि त्याला हताश होऊ नको, असा सल्ला दिला. शुबमन गिल, रिषभ पंत, टी नटराजन, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सूंदर, मोहम्मद सिराज यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. विराट कोहली- अनुष्का शर्मा यांच्या लेकीचं बारसं; बॉलिवूड अभिनेत्रीनं जाहीर केलं नाव
पाहा व्हिडीओ...