Budget 2021 : भाषणात ४८ वेळा 'टॅक्स' शब्दाचा वापर; पण तरीही 'टॅक्स'पेयर्सच्या हाती निराशाच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 05:30 PM2021-02-01T17:30:49+5:302021-02-01T17:33:02+5:30

गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थमंत्र्यांनी केलं १ तासांचं कमी भाषण

Budget 2021 Use of the word tax Word 48 times in speeche But still the disappointment of tax payers nirmala sitharaman | Budget 2021 : भाषणात ४८ वेळा 'टॅक्स' शब्दाचा वापर; पण तरीही 'टॅक्स'पेयर्सच्या हाती निराशाच

Budget 2021 : भाषणात ४८ वेळा 'टॅक्स' शब्दाचा वापर; पण तरीही 'टॅक्स'पेयर्सच्या हाती निराशाच

Next
ठळक मुद्देगेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थमंत्र्यांनी केलं १ तासांचं कमी भाषणअर्थमंत्र्यांकडून कृषी सेस लावण्यात येणार असल्याची घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यादरम्यान त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे कामगार वर्गाच्या पदरी थोडी निराशाच पडली. याव्यतिरिक्त पेट्रोल, डिझेल, सोनं, चांदी आणि मद्यासहित अनेक वस्तूंवर सरकारनं कृषी सेस लावण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेलवर लावण्यात आलेल्या सेसचा थेट परिणाम जनतेवर होणार नाही. परंतु अन्य वस्तूंवर लावण्यात आलेल्या सेसमुळे महागाई नक्कीच वाढणार आहे. 

२०१९ नंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तिसरा अर्थसंकल्प सादर केला. परंतु यावेळी त्याचं भाषण कमी कालावधीचं होतं. यावेळी त्यांनी १ तास ४८ मिनिटांमध्ये अर्थसंकल्प सादर केला. यापूर्वी २०१९ मध्ये त्यांनी २ तास १५ मिनिटं आणि २०२० मध्ये २ तास ४२ मिनिटांमध्ये अर्थसंकल्प सादर केला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास एक तास त्यांचं भाषण लहान होतं. 

आपल्या भाषणादरम्यान अर्थमंत्र्यांनी सर्वधिक वेळा 'टॅक्स' या शब्दाचा वापर केला. त्यांनी आपल्या भाषणादरम्यान एकूण ४८ वेळा हा शब्द वापरला. तर इन्फ्रास्ट्रक्चर २९ वेळा, परिवहन २८ वेळा, आरोग्य २५ वेळा, अर्थव्यवस्था २१ वेळा आणि कोरोना या शब्दाचा उच्चार १६ वेळा केला. तर रोजगार, डिजिटल आणि तरूण या शब्दांचा त्यांनी सर्वाक कमी वेळा उच्चार केला. यावेळी अर्थसंकल्पाक अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यापैकी एक म्हणजे विमा क्षेत्रातीस थेट परकीय गुंतवणूक ४९ टक्क्यांवरून वाढवून ७४ टक्के करण्यात आली. परंतु संचालक मंडळात भारतीय सदस्यच असणार अशीही अट ठेवण्यात आली. याव्यतिरिक्त स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांत सीतारामन यांनी ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना एक चांगली बातमी दिली. त्यांना आयकर रिटर्न करण्यापासून सूट देण्यात आली आहे. तसंच त्यांना पेन्शनद्वारे मिळणाऱ्या उत्पनातून कोणताही कर द्यावा लागणार नाही. सध्या टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. त्यामुळे सामान्य करदात्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

Web Title: Budget 2021 Use of the word tax Word 48 times in speeche But still the disappointment of tax payers nirmala sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.