Budget 2022: पोस्ट ऑफिसमध्ये जमा आहेत तुमचे पैसे? वाचा याबाबत सरकारने काय केलीये घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 02:57 PM2022-02-01T14:57:39+5:302022-02-01T14:57:46+5:30
Budget 2022 post office: देशभरातील 1.5 लाखांहून अधिक पोस्ट ऑफिस कोअर बँकिंग प्रणालीशी जोडले जाणार आहेत.
नवी दिल्ली: आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. याअंतर्गत अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, देशभरातील 1.5 लाखांहून अधिक पोस्ट ऑफिस कोअर बँकिंग प्रणालीशी जोडले जातील.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात बँकिंग क्षेत्र आणि करदात्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. या घोषणेमुळे पोस्ट ऑफिस सेवेत प्रचंड बदल होणार असून लाखो आणि करोडो ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. याशिवाय 75 डिजिटल बँकिंग युनिटही उघडण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. कमीत कमी खर्चात डिजिटल बँकिंगला चालना देण्याचे काम केले जाईल. यासोबतच डिजिटल बँकिंगला सरकारचा पाठिंबा कायम राहणार आहे.
शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना फायदा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, भारतातील सर्व 1.5 लाख पोस्ट ऑफिस मूलभूत बँकिंग प्रणालीशी जोडले जातील. याद्वारे लोक त्यांचे खाते स्वतःच ऑनलाइन ऑपरेट करू शकतील. यासोबतच पोस्ट ऑफिस खाती आणि इतर बँकांमध्येही ग्राहक स्वतःहून पैशांचे व्यवहार करू शकतील.
ग्रामीण भागात फायदा
2022 मध्ये देशातील सर्व 1.5 लाख पोस्ट ऑफिस बेसिक बँकिंग प्रणालीशी जोडले जातील. यामुळे नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, एटीएम आणि पोस्ट ऑफिस खात्यांचे संचालन शक्य होईल. त्यांच्यामध्ये निधीची देवाणघेवाण होईल, यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना फायदा होईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.