Budget 2023 : सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मोठा दिलासा; सरकार देणार 9 हजार कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 02:13 PM2023-02-01T14:13:59+5:302023-02-01T14:14:36+5:30
Budget 2023: भारतातील सुमारे 45% रोजगार MSME मुळे उपलब्ध आहे, त्यामुळे या क्षेत्रावर सरकारचे विशेष लक्ष आहे.
Budget 2023 : देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्प 2023 मध्ये एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, MSME साठी क्रेडिट हमी योजना सुधारित केली जाईल आणि 1 एप्रिल 2023 पासून लागू केली जाईल. यासाठी कॉर्पसमध्ये 9000 कोटी रुपये जोडण्याची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने सांगितले की, 30 स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर्स स्थापन करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, सरकार प्रधानमंत्री कौशल विकास योजना 4.0 लाँच करणार आहे. तसेच, तरुणांना आंतरराष्ट्रीय संधींसाठी कौशल्य देण्यासाठी विविध राज्यांमध्ये 30 स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर्स सुरू करण्यात येतील.
एमएसएमईवर सरकारचे विशेष लक्ष
MSME म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग. देशातील लघु उद्योगांना चालना देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी, भारत सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची स्थापना केली आहे. भारतातील सुमारे 45% रोजगार लहान उद्योगांमुळे उपलब्ध आहे, त्यामुळे या क्षेत्रावर सरकारचे विशेष लक्ष आहे. भारताद्वारे निर्यात केल्या जाणार्या सुमारे 50% वस्तूंचे उत्पादन केवळ लहान उद्योगांकडून केले जाते.