संसदेचे उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, १ फेब्रुवारीला सादर होणार बजेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 02:09 AM2018-01-28T02:09:14+5:302018-01-28T02:09:34+5:30
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरू होत असल्याने, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्व पक्षांच्या सभागृहातील नेत्यांची बैठक उद्या, रविवारी बोलावली आहे. सभागृहात उपस्थित होणाºया विषयांवर तिथे चर्चा होईल. या अधिवेशनात ‘ट्रिपल तलाक’च्या मुद्द्यावरून सरकार व विरोधक यांच्यात खटके उडतील.
नवी दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरू होत असल्याने, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्व पक्षांच्या सभागृहातील नेत्यांची बैठक उद्या, रविवारी बोलावली आहे. सभागृहात उपस्थित होणाºया विषयांवर तिथे चर्चा होईल. या अधिवेशनात ‘ट्रिपल तलाक’च्या मुद्द्यावरून सरकार व विरोधक यांच्यात खटके उडतील.
अशीच एक बैठक सरकारतर्फेही बोलावण्यात आली आहे. त्यास विरोधी नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही उपस्थित राहतील. त्या बैठकीतही सरकारतर्फे मांडली जाणारी विधेयके आणि विरोधकांतर्फे मांडण्यात येणारे मुद्दे यांवर चर्चा अपेक्षित आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा २९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या काळातील आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारतर्फे आर्थिक आढावा सादर करण्यात येईल आणि १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प सादर करतील. केंद्र सरकारचा हा शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प असेल. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका अपेक्षित असून, त्यामुळे संपूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार नाही.
अधिवेशनाच्या दुसºया टप्प्यात म्हणजे ५ मार्च ते ६ एप्रिल या काळात ‘ट्रिपल तलाक’चे व ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचे विधेयक मांडले जाणे अपेक्षित आहे. तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झाले असले, तरी राज्यसभेमध्ये ते विरोधकांनी रोखून धरले आहे. ते संसदेच्या चिकित्सा समितीकडे पाठवावे, असा विरोधकांचा आग्रह आहे, तसेच विरोधकांतर्फे विधेयकात काही नव्या दुरुस्त्याही सुचविल्या जातील, असे समजते.
कोविंद यांचे पहिले अभिभाषण
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीपुढे २९ जानेवारीला अभिभाषण होईल. राष्टÑपतींचे हे पहिलेच अभिभाषण असेल. त्यांच्या भाषणातून मोदी सरकारच्या नव्या योजनांची माहिती समजू शकेल.