विरोधक आक्रमक! राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काँग्रेस, शिवसेनेसह १६ विरोधी पक्षांचा बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 03:53 PM2021-01-28T15:53:48+5:302021-01-28T15:55:11+5:30

Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. भारतीय संसदीय पद्धतीप्रमाणे संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने केली जाते.

Budget Session: 16 opposition parties united against farm laws and boycott President address in Budget session | विरोधक आक्रमक! राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काँग्रेस, शिवसेनेसह १६ विरोधी पक्षांचा बहिष्कार

विरोधक आक्रमक! राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काँग्रेस, शिवसेनेसह १६ विरोधी पक्षांचा बहिष्कार

Next
ठळक मुद्देकेंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता सादर करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : उद्यापासून म्हणजेच २९ जानेवारीपासून संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. मात्र, या अर्थसंकल्पीय अधिवेशनमधील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात १६ राजकीय पक्षांनी प्रसिद्धीत्रक जारी केले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार घालणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जेकेएनसी, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, सीपीआय (एम), सीपीआय, आययूएमएल, आरएसपी, पीडीप, एमडीएमके, केरळ काँग्रेस आणि अेआययूडीएफ यांचा समावेश आहे.

"आम्ही १६ राजकीय पक्षांद्वारे एक निवदेन जारी केले असून उद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घालणार आहोत. या निर्णयामागील मुख्य कारण म्हणाजे केंद्र सरकारने कृषी कायदे सभागृहात विरोधकांशिवाय जबरदस्तीने मंजूर केले आहेत", असे राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. भारतीय संसदीय पद्धतीप्रमाणे संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने केली जाते. त्यामुळे लोकसभा सचिवालयाने सांगितले आहे की, २९ जानेवारीला सकाळी ११ वाजता राष्ट्रपती एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. तर केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता सादर करण्यात येणार आहे.

Web Title: Budget Session: 16 opposition parties united against farm laws and boycott President address in Budget session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.