सत्तेवर आल्यापासूनची मोदी सरकारची सर्वात खराब कामगिरी; ७२ टक्के जनता म्हणतेय...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 12:21 PM2021-02-01T12:21:38+5:302021-02-01T12:22:11+5:30

नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून प्रथमच तीन चतुर्थांश लोकांनी व्यक्त केली नाराजी

budget survey 72 people believe that inflation has increased after modi became pm | सत्तेवर आल्यापासूनची मोदी सरकारची सर्वात खराब कामगिरी; ७२ टक्के जनता म्हणतेय...

सत्तेवर आल्यापासूनची मोदी सरकारची सर्वात खराब कामगिरी; ७२ टक्के जनता म्हणतेय...

Next

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशातील महागाई अनियंत्रित झाल्याचं मत तीन चतुर्थांश लोकांनी व्यक्त केलं आहे. आयएएनएस-सी व्होटरनं अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर एक सर्व्हे केला होता. मोदी पंतप्रधान झाल्यापासून महागाईत नियंत्रणाबाहेर गेल्याचं ७२.१ टक्के लोकांना वाटतं. २०१५ मध्ये हेच प्रमाण १७.१ टक्के होतं. मोदींच्या कार्यकाळात वस्तू आणि सेवांच्या किमती कमी झाल्याचं मत केवळ १०.८ टक्के व्यक्त केलं होतं. तर १२.८ टक्के लोकांनी काहीच बदललं नसल्याचं म्हटलं आहे. २०१४ नंतर पहिल्यांदाच आर्थिक आघाडीवर सरकारची कामगिरी इतकी खराब झाली आहे.

देशात पहिल्यांदाच स्थापन होऊ शकते 'बॅड बँक'; अर्थमंत्री महत्त्वाची घोषणा करणार?

पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या कार्यकाळात देशाची आर्थिक आघाडीवरील कामगिरी अपेक्षेपेक्षा खराब झाल्याचं मत ४६.४ टक्के लोकांनी व्यक्त केलं. सरकारची कामगिरी अपेक्षापेक्षा चांगली असल्याचं केवळ ३१.७ टक्के जणांना वाटतं. गेल्या १० वर्षांतील ही सर्वात वाईट कामगिरी आहे. महागाई वाढल्याचा अतिशय जास्त परिणाम झाल्याचं मत ३८.२ टक्के लोकांनी व्यक्त केलं. तर ३४.३ टक्के जणांना थोडा परिणाम झाल्याचं वाटतं.

बजेटच्या दिवसाची सुरुवात गोड; सेन्सेक्स ४४३ अंकांनी वधारला

गेल्या वर्षभरात जीवनमानाचा दर्जा खालावला असल्याचं जवळपास निम्म्या लोकांनी सांगितलं. गेल्या एका वर्षांच्या कालावधीत सामान्य माणसाच्या जीवनमानाचा दर्जा घसरला असल्याचं ४८.४ टक्के लोकांना वाटतं. तर सर्व्हेत सहभागी झालेल्या २८.८ टक्के जणांना जीवनमानाचा दर्जा सुधारल्याचं वाटतं. तर जीवनमानाच्या दर्जात कोणताही बदल न झाल्याचं मत २१.३ टक्के लोकांनी व्यक्त केलं.

सर्व्हेत सहभागी झालेल्या लोकांनी येणाऱ्या दिवसांबद्दल आशावाद व्यक्त केला. येत्या वर्षभरात जीवनामानाचा दर्जा सुधारेल, असं ३७.४ टक्के लोकांना वाटतं. पण २५.८ टक्के लोकांना जीवनमानाचा दर्जा आणखी खालावेल असं वाटतं. तर २१.७ टक्के लोकांना जीवनमानाचा दर्जा तसाच राहील असं वाटतं.

Web Title: budget survey 72 people believe that inflation has increased after modi became pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.