अयोध्येतील जन्मभूमीवर राममंदिर लवकरात लवकर बांधा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 02:21 AM2020-08-06T02:21:51+5:302020-08-06T02:22:09+5:30
कार्यक्रमानंतर झालेल्या सभेत ते म्हणाले की, अयोध्येत रामजन्मभूमीवर श्रीरामाचे भव्य मंदिर व्हावे, अशी देशविदेशांतील करोडो रामभक्तांची इच्छा आहे.
महंत नृत्यगोपालदास
नवी दिल्ली : अयोध्येत रामजन्मभूमीवर प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर लवकरात लवकर बांधून पूर्ण करावे. या कामात कोणताही विलंब होऊ नये, असे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे प्रमुख महंत नृत्यगोपालदास यांनी म्हटले आहे.
कार्यक्रमानंतर झालेल्या सभेत ते म्हणाले की, अयोध्येत रामजन्मभूमीवर श्रीरामाचे भव्य मंदिर व्हावे, अशी देशविदेशांतील करोडो रामभक्तांची इच्छा आहे. राममंदिरासाठी आतापर्यंत अनेकांनी तन-मन-धन अर्पण केले आहे. आता तर मंदिर उभारण्याच्या प्रत्यक्ष कार्याला सुरुवात झालेली आहे. महंत नृत्यगोपालदास यांनी सांगितले की, रामजन्मभूमीवर भव्यदिव्य राममंदिर उभारलेले ‘याचि देही याचि डोळा’ अनेकांना पाहायचे आहे. त्यांची ही इच्छा शक्यतो लवकर पूर्ण व्हावी.
मंदिर उभारणीचा श्रीगणेशा : श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे प्रमुख महंत नृत्यगोपालदास म्हणाले की, रामजन्मभूमीमध्ये भूमिपूजन होऊन मंदिर उभारणीच्या कार्याचा श्रीगणेशा झाला आहे. या लढ्यात अनेक अडथळे आले; पण रामभक्त डगमगले नाहीत. त्यामुळे आजचा भूमिपूजनाचा दिवस सर्वांना पाहायला मिळाला आहे. हा करोडो रामभक्तांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण आहे.