कानपूर येथे बिल्डिंग कोसळून 7 जण ठार
By admin | Published: February 1, 2017 05:42 PM2017-02-01T17:42:46+5:302017-02-01T17:42:46+5:30
कानपूरमधील जायमऊ येथे आज इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली सापडून सात जणांचा मृत्यू झाला
Next
ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. 1 - कानपूरमधील जायमऊ येथे आज इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली सापडून सात जणांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 12 लोकांना वाचवण्यात आले असून, अद्याप 30 ते 40 लोक ढिगाऱ्याखाली अडकलेले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
इमारत कोसळल्यानंतर घटनास्थळी तात्काळ मदतकार्यास सुरुवात करण्याच आली असून, लष्कर, पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी मदत कार्यात गुंतले आहेत. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक स्त्रिया आणि मुले अडकलेली असून, आतापर्यंत 12 जणाना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. इमारत कोसळल्याने जवळपास असलेल्या घरांचेही नुकसान झाले आहे. तसेच दुर्घटनास्थळी जाण्यासाठी मोठा रस्ता उपलब्ध नसल्याने मदतकार्यामध्ये अडथळे येत आहेत. या दुर्घटनेबाबत माहिती देताना कानपूरचे जिल्हादंडाधिकार कौशल राज यांनी तज्ज्ञांचे पथक चौकशीसाठी घटनास्थळी पाठवण्यात आले असून, मदतकार्य सुरू असल्याचे सांगितले.
Kanpur building collapse: 4 dead, 12 persons rescued. Rescue ops underway by Army, Police & Fire Brigade pic.twitter.com/0HAdp7RJ9t
— ANI (@ANI_news) February 1, 2017
Team of experts will be set for investigation of the building collapsed in Kanpur's Jajmau. Rescue ops underway: Kanpur DM Kaushal Raj pic.twitter.com/D1AcXBpnEI
— ANI UP (@ANINewsUP) February 1, 2017