भारतीय अर्थव्यवस्थेला मिळणार 'लिफ्ट'; २०२१ पर्यंत होणार जगातील दुसरी मोठी बाजारपेठ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 03:07 PM2018-02-20T15:07:02+5:302018-02-20T15:07:26+5:30
२०१६ साली लिफ्टच्या बाजारपेठेचे आकारमान ६८,२०० यूनिट्सचे होते.
मुंबई: देशभरात मेट्रो शहरांची तसेच, स्मार्ट शहरांची संख्या वाढत चालल्याने येथील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी उंच (बहुमजली) इमारती बांधण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. २०१७ ते २०२१ या कालावधीत एस्कलेटर्सच्या संख्येत वार्षिक सरासरी २,५०० ते ३,००० इतकी वाढ होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. लिफ्ट्सच्या बाबतीत २०१६ साली लिफ्टच्या बाजारपेठेचे आकारमान ६८,२०० यूनिट्सचे होते. ते २०२१ सालापर्यंत १०४,६०० यूनिट्सपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. मेट्रो शहरांत इमारतींची उंची वाढवल्यामुळे शहरातील जागेचा प्रश्न सुटणार असून यामध्ये दर्जेदार लिफ्ट तयार करण्यासाठी उत्कृष्ट तंत्रज्ञानाचा उपयोगही तितकाच महत्वाचा ठरणार आहे. वेगवान, किफायतशीर ऊर्जेचा वापर करणाऱ्या लिफ्ट्समुळे इमारतींच्या परिचालन किमतीही कमी होऊ शकतील. मुंबईत २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०१८ या कालावधीत आंतरराष्ट्रीय एलिवेटर आणि एस्कलेटर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या क्षेत्रातील तंत्रज्ञानविषयक समस्या, नवीन संशोधने, सौंदर्यात्मक रचना आणि उभ्या दिशेने केल्या जाणाऱ्या दळणवळण क्षेत्राबाबत चर्चा या प्रदर्शनात करण्यात येणार आहेत.
या व्यापारी मेळाव्याला महाराष्ट्र सरकार व ऊर्जा, वृत्त आणि नवनिर्माणक्षम ऊर्जा राज्य मंत्री माननीय श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचा पाठिंबा मिळाला असून याबाबत बोलताना श्री. बावनकुळे म्हणाले, मेस्सी फ्रँकफर्ट इंडिया या कंपनीतर्फे आंतरराष्ट्रीय एलिवेटर आणि एस्कलेटर २०१८ (आयईई- २०१८) हा मेळावा बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात येत असल्याचा मला फार आनंद होत आहे. हा लिफ्ट/एलिवेटर क्षेत्रासंबंधीचा भारतातील सर्वांत मोठा मेळावा आहे. भारत ही संपूर्ण आशिया खंडातील सर्वांत सक्षम बाजारपेठ असून जगातल्या एस्कलेटर्स आणि लिफ्ट्सच्या बाजारपेठांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. देशातल्या बऱ्याच मेट्रो शहरांमधील नव्या मेट्रो रेल्वे प्रकल्पांमुळे एस्कलेटर्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून भारतीय रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आणि आधुनिकीकरण हेही यामागचे महत्वाचे कारण आहे. ग्राहकांना, प्रवाश्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्यामध्ये एस्कलेटर्सचा मोलाचा वाटा आहे.
भारतातील एलिवेटर आणि एस्कलेटर्सच्या आयईई एक्स्पो २०१८ या सर्वांत मोठ्या प्रदर्शनास काही आठवडेच राहिले असल्याने या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी काही मोठ्या कंपन्यांनीही कंबर कसली आहे. यात फुजीटेक, हिताची, सिटी लिफ्ट्स, एव्ही कॅम, मास इंडस्ट्रीज, इंडिटेक सिस्टीम्स, मॉन्टेनरी, जेफ्रान, एव्हियर, विट्टूर, फर्मेटर, किनेटेक आदी अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. या प्रदर्शनात १० देशांतील साधारण १७० हून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत. भारतीय बाजारपेठांमधील वृद्धीच्या शक्यता पाहता चीन, इटली, जर्मनी आणि यूएसए या देशांतील मोठ्या कंपन्यांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत चाललेला पहायला मिळतो. मेस्सी फ्रँकफर्ट ट्रेड फेअर्स इंडियाच्या नावाने या प्रदर्शनाचे पहिले सत्र मुंबईतील बॉम्बे एक्जिबिशन केंद्रात २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०१८ या कालावधीत रंगणार आहे. प्रदर्शनाबाबतच्या अधिक माहितीसाठी कृपया www.ieeexpo.com या संकेतस्थळाला भेट द्या.