BSP ऐवजी BJP ला वोट, पश्चाताप झाला म्हणून कापलं बोट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 09:06 AM2019-04-19T09:06:58+5:302019-04-19T09:22:29+5:30

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ईव्हीएम मशीनवर चुकून बसपा ऐवजी भाजपाला मत दिल्याने एका बसपा कार्यकर्त्याने स्वत:चं बोट कापल्याची  घटना घडली आहे.

bulandshahr after voting for bjp by mistake bsp supporter chops off his finger later releases | BSP ऐवजी BJP ला वोट, पश्चाताप झाला म्हणून कापलं बोट

BSP ऐवजी BJP ला वोट, पश्चाताप झाला म्हणून कापलं बोट

Next
ठळक मुद्देईव्हीएम मशीनवर चुकून बसपा ऐवजी भाजपाला मत दिल्याने एका बसपा कार्यकर्त्याने स्वत:चं बोट कापल्याची घटना घडली आहे.बुलंदशहरमधील शिकारपूर भागातील मतदान केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पवन सिंह असे बोट कापणाऱ्या तरुणाचे नाव असून तो अब्दुलापूर हुलासन गावचा रहिवासी आहे.

लखनौ - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी (१८ एप्रिल) झाले. अत्यंत उत्साहात आणि उत्स्फूर्तपणे मतदारांनी रांगा लावून आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ईव्हीएम मशीनवर चुकून बसपा ऐवजी भाजपाला मत दिल्याने एका बसपा कार्यकर्त्याने स्वत:चं बोट कापल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलंदशहरमधील शिकारपूर भागातील मतदान केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पवन सिंह असे बोट कापणाऱ्या तरुणाचे नाव असून तो अब्दुलापूर हुलासन गावचा रहिवासी आहे. बुलंदशहर मतदारसंघातून बसपाने उमेदवार योगेश शर्मा यांना तिकीट दिले आहे तर त्यांच्याविरोधात भाजपाने भोला सिंग यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात गुरुवारी मतदान झाले. 

शिकारपूर भागातील मतदान केंद्रावर पवन सिंह  मतदान करण्यासाठी गेला होता. मात्र BSP ऐवजी BJP ला त्याने मत दिले. चुकून भाजपाचे चिन्ह असलेले बटण दाबले. त्याच्या या चुकीचा त्याला पश्चाताप झाल्यावर त्याने मतदानानंतर स्वत:च्या हाताचं बोट कापलं. बोट कापल्याची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांनी पवनला लगेचच उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. चुकून भाजपाला मत दिल्यामुळे बोट कापल्याची माहिती पवन सिंह यांने दिली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

देशातील ९५ मतदारसंघांत ७० टक्क्यांनी बजावला हक्क

पश्चिम बंगाल व तामिळनाडूतील हिंसाचाराच्या काही घटना वगळता १२ राज्ये व एक केंद्रशासित प्रदेशातील ९५ लोकसभा मतदारसंघांत गुरुवारी शांततेत मतदान झाले. वरील दोन राज्यांत हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार, अश्रुधूर व हवेत गोळीबार करावा लागला. या मतदारसंघांत सरासरी ६९.४0 टक्के मतदान झाले.

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये १५ टक्के तर उधमपूरमध्ये ६२ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. श्रीनगरमधील ईदगाह, खनयार, हब्बा कदल व बाटमालू या परिसरातील ९० केंद्रांवर एकाही मतदाराने मतदान केले नाही. तामिळनाडूमध्ये ७२ टक्के, आसाममध्ये ७३ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ७५ टक्के, मणिपूरमध्ये ७४ टक्के तर छत्तीसगडमध्ये ७१ टक्के मतदान झाले. पण कर्नाटक, ओडिशा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये मतदानाचे प्रमाण ६१ ते ६५ टक्क्यांच्या आसपासच होते.

ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी काही ठिकाणी आल्याने यंत्रे बदलून देण्यात आली. दार्जिलिंगमध्ये काहींनी ईव्हीएमची नासधूस केली. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी बुथ बळकावल्याचा आरोप द्रमुकने केला. मात्र त्यात तथ्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बंगालमधील एका बुथमध्ये मतदानास मज्जाव केल्याची तक्रार करीत लोकांनी रास्ता रोको केला. माकपचे उमेदवार मोहम्मद सलिम यांच्या वाहनावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची तक्रार आहे. ते वाहन नंतर जाळण्यात आले. त्यामुळे मोहम्मद सलिम यांना एका मतदान केंद्रात आसरा घ्यावा लागला.

 

Web Title: bulandshahr after voting for bjp by mistake bsp supporter chops off his finger later releases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.