Bulldozer Model: नितिन गडकरींच्या पत्नीने विचारले- उत्तर प्रदेशात काय सुरू आहे? गडकरींनी दिले अनोखे उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 08:57 PM2023-03-13T20:57:32+5:302023-03-13T20:59:35+5:30

Nitin Gadkari on Yogi Adityanath: क्राइम स्टेट अशी ओळख असलेल्या उत्तर प्रदेशात सध्या माफिया आणि कुख्यात गुन्हेगारांवर योगी सरकारचा बुलडोझर फिरत आहे.

Bulldozer Model: Nitin Gadkari's wife asked- What is going on in Uttar Pradesh? Gadkari gave a unique answer | Bulldozer Model: नितिन गडकरींच्या पत्नीने विचारले- उत्तर प्रदेशात काय सुरू आहे? गडकरींनी दिले अनोखे उत्तर...

Bulldozer Model: नितिन गडकरींच्या पत्नीने विचारले- उत्तर प्रदेशात काय सुरू आहे? गडकरींनी दिले अनोखे उत्तर...

googlenewsNext


Nitin Gadkari on Bulldozer Model: क्राइम स्टेट अशी ओळख असलेल्या उत्तर प्रदेशात सध्या माफिया आणि कुख्यात गुन्हेगारांवर योगी सरकारचा बुलडोझर फिरत आहे. मुख्तार अन्सारीपासून ते अतिक अहमदपर्यंत कोणाचीही गय केली जात नाहीये. यूपीच्या बुलडोझर मॉडेलची देशभर चर्चा आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युपीबाबत एक अनोखी गोष्ट शेअर केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, माझ्या पत्नीने विचारले की, उत्तर प्रदेशात सध्या काय सुरू आहे? मी म्हणालो की, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने धर्माच्या रक्षणासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी हत्यार उचलले होते, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील दुष्टांचा नाश करण्याचे काम करत आहेत.

बुलडोझर यूपी सरकारचे प्रमुख हत्यार 
2020 मध्ये यूपीमध्ये सुरू झालेले बुलडोझरचे राजकारण आता योगी आदित्यनाथ सरकारचे प्रमुख शस्त्र बनले आहे. बुलडोझरकडे सहसा तोडफोडीचे यंत्र म्हणून पाहिले जाते, परंतु आता ते केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर राज्याबाहेरही सुशासनाचे प्रतीक बनले आहे. देशातील बहुतांश सरकारे, प्रामुख्याने भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारे बुलडोझरचा वापर गुन्हेगारांच्या संपत्तीवर करत आहे.

योगी आदित्यनाथ सरकारच्या काळात जुलै 2020 मध्ये बुलडोझरची चर्चा सुरू झाली. कानपूरच्या बिक्रू गावात गुंड विकास दुबेचे घर पाडण्यासाठी बुलडोझरचा वापर झाला. दुबे हा आठ पोलिसांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी होता आणि त्याच्या घरावर बुलडोझर फिरवल्याने दहशतवादाने ग्रासलेल्या भागात त्वरित न्याय दिल्यासारखे वाटले. त्यानंतर मुख्तार अन्सारी आणि अतिक अहमद यांसारख्या माफिया डॉनच्या बेकायदेशीरपणे मालमत्ता पाडण्यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात आला. याशिवाय राज्यात अनेक प्रकरणांमध्ये थेट बुलडोझरने कारवाई झाली आहे.

Web Title: Bulldozer Model: Nitin Gadkari's wife asked- What is going on in Uttar Pradesh? Gadkari gave a unique answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.