बुलेट ट्रेनसाठी प्रभूंच्या हाती छडी.!

By admin | Published: November 16, 2014 02:01 AM2014-11-16T02:01:28+5:302014-11-16T02:01:28+5:30

प्रशासनातील फेरफारांसह अधिका:यांना वठणीवर आणण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी योजना आखली असून,‘मेट्रोमॅन’ ई. श्रीधरन यांच्या हाती धुरा सोपविली आहे.

The bullet train is in the hands of God! | बुलेट ट्रेनसाठी प्रभूंच्या हाती छडी.!

बुलेट ट्रेनसाठी प्रभूंच्या हाती छडी.!

Next
रेल्वेत तीन महिन्यांत आमूलाग्र बदल : मेट्रोमॅन श्रीधरन यांच्या अहवालानंतर कायापालट होणार
रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
मागील चार महिन्यांत कोणतीच प्रगती सुस्तावलेल्या रेल्वे मंत्रलयाकडून झाली नसल्याने प्रशासनातील फेरफारांसह अधिका:यांना वठणीवर आणण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी योजना आखली असून,‘मेट्रोमॅन’ ई. श्रीधरन यांच्या हाती धुरा सोपविली आहे.
मुंबई - अहमदाबाद मार्गावरील  6क् हजार कोटींची बुलेट ट्रेन, मुंबईसह देशातील 1क् रेल्वेस्थानकांचा एअरपोर्ट सारखा विकास तसेच मुंबईमध्ये पुढील दीड वर्षात लोकलच्या वाढणा:या 86क् फे:यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आह़े सध्याच्या बेपर्वाईमुळे रखडलेले व पंतप्रधानांच्या स्वप्नातील रेल्वे प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण होऊच शकणार नाहीत, हे त्यांनी पंतप्रधानांना पटवून दिल्याने ‘रेल्वेतील स्वच्छता मोहीम’सुरू झाली. तीन महिन्यानंतर बुलेटट्रेनचे काय होईल,ते कळू शकेल, असेच आज म्हणता येईल.
रेल्वे वर्ल्डक्लास करण्याचे नियोजन पंतप्रधान मोदी यांनी माजी रेल्वेमंत्र्यांना सांगूनही अधिका:यांनी कमालीची सुस्ती बाळगल्याने ‘भ्रष्टाचारमुक्त रेल्वे व अधिका:यांची जबाबदारी निश्चिती’ करण्याचा घडाकेबाज कार्यक्रम आता नव्या रेल्वेमंत्र्यांनी हाती घेतला. त्यासाठी तीन महिन्यांची मुदतही ठरविली आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या अहवालानुसार 2क्13 या वर्षात भ्रष्टाचाराच्या देशातील सर्वाधिक तक्रारी रेल्वेतील आहेत. प्रभू यांनी हा आढावा घेतल्यावर रेल्वेतील स्वच्छता मोहीम हाती घेतली. अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यासह त्यांनी काही बदल केले मात्र भ्रष्टाचाराची कीड व बेपर्वावृत्ती यामुळे कमी होणार नाही, असे लगेचच ध्यानात आल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी रेल्वेचे माजी अधिकारी ई. श्रीधरन यांची समिती स्थापन केली. श्रीधरन यांचे कोकण रेल्वेचे काम प्रभू यांनी जवळून पाहिल्याने त्यांनी श्रीधरन यांना यासाठी विनंती केल्याचे सूत्रने सांगितले. ही समिती हिवाळी अधिवेशनादरम्यान अंतरिम अहवाल देणार आहे. 
कालमर्यादेपूर्वीच रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याची श्रीधरन यांची ख्याती असून, 781 किलोमीटरचा कोकण रेल्वेचा अवघड पल्ला नऊ वर्षात गाठला व त्यानंतर नवी दिल्ली मेट्रोचा पहिला टप्पा त्यांनी मुदतीपूर्वी दोन वर्षे नऊ महिने पूर्ण केला. यापूर्वी शास्त्रज्ज्ञ अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे सुरक्षा समितीच्या अहवालालाही अधिका:यांनी फारसे गांभिर्याने घेतले नसल्याने प्रभू यांनी हाती छडी घेतल्याचे सूत्रने सांगितले. 
 
च्रेल्वेमध्ये 17 हजार उमेदवारांची भरती करायची आहे, त्यात महिलांच्या सुरक्षेसाठी नेमायच्या चार हजार महिला कॉन्स्टेबलचा समावेश आहे, पण त्यावरही प्रगती नाही. 
च्5 मार्गावर हायस्पीड ट्रेन सुरू करायच्या आहेत, त्याची फाईल तयार पण निर्णय नाही. 
4जगात सर्वाधिक मालवाहतूक करणा:या भारतीय रेल्वे जागेवर येण्यासाठी 5क् हजार कोटींची गरज आहे, त्याबाबत नियोजन नाही. त्यामुळे नवे प्रकल्प अडचणीत.

 

Web Title: The bullet train is in the hands of God!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.