तेढ पसरविणाऱ्या चॅनेल्सना दणका; लाखोंच्या दंडासह व्हिडीओ हटविण्याचे एनबीडीएसएचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 07:11 AM2024-03-02T07:11:33+5:302024-03-02T07:11:43+5:30

एनबीडीएसएने ‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीला काँग्रेस नेते राहुल गांधींविषयक काल्पनिक व्हिडीओ काढून टाकण्याचे निर्देश दिले.

Bump to the channels that spread the noise; NBDSA orders deletion of video with penalty | तेढ पसरविणाऱ्या चॅनेल्सना दणका; लाखोंच्या दंडासह व्हिडीओ हटविण्याचे एनबीडीएसएचे आदेश

तेढ पसरविणाऱ्या चॅनेल्सना दणका; लाखोंच्या दंडासह व्हिडीओ हटविण्याचे एनबीडीएसएचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : स्वयं नियामक संस्था, न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टँडर्ड्स अथॉरिटीने (एनबीडीएसए) काही दूरचित्रवाणी वाहिन्यांना आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे आणि त्यांच्या वाहिन्यांवरील काही कार्यक्रम वेबसाइटवरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

नियामक संस्थेने असे म्हटले आहे की, असे कार्यक्रम द्वेष आणि जातीय तेढ पसरवतात आणि हे चांगले नाही. एनबीडीएसएने यासंदर्भात “लव्ह जिहाद”वरील त्यांच्या बातम्यांच्या कार्यक्रमांसाठी इंद्रजीत घोरपडे यांनी केलेल्या तक्रारींच्या आधारे टाईम्स नाऊ नवभारतला १ लाख आणि न्यूज १८ इंडियाला ५०,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘लव्ह जिहाद’ ही संज्ञा उजव्या विचारसरणीच्या काही लोकांनी हिंदू तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून धर्मांतर करण्यासाठी मुस्लीम पुरुषांनी रचल्याचा आरोप केला आहे. आजतक वृत्तवाहिनीनेही रामनवमीच्या दिवशी एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करणाऱ्या हिंसाचाराच्या वृत्तांकन केले आहे. एनबीडीएसएचे अध्यक्ष न्यायमूर्ती (निवृत्त) ए. के. सिक्री यांनी  हे आदेश जारी केले आहेत.

राहुल गांधींचा व्हिडीओही...
एनबीडीएसएने ‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीला काँग्रेस नेते राहुल गांधींविषयक काल्पनिक व्हिडीओ काढून टाकण्याचे निर्देश दिले. काल्पनिक व्हिडीओ हीन रुची दर्शवतो आणि ते टाळायला हवे. हा व्हिडीओ आज तकचे यूट्यूबचे चॅनेल आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून काढून टाका, असे निर्देश एनबीडीएसएने दिले.

Web Title: Bump to the channels that spread the noise; NBDSA orders deletion of video with penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.