दहावी पास व्यक्तींसाठी पोस्टात बंपर भरती, महाराष्ट्रात तब्बल एवढ्या जागा भरणार, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 04:49 PM2023-01-28T16:49:07+5:302023-01-28T16:49:34+5:30
India Post Recruitment 2023 : भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी बंपर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी बंपर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इंडिया पोस्टमध्ये ब्रँच पोस्टमास्तर (बीपीएम), असिस्टंट ब्रँच पोस्टमास्तर (एबीपीएम) पदांच्या एकूण ४० हजार ८८९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच ती १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना ही भरती प्रक्रिया म्हणजे उत्तम संधी आहे. इंडिया पोस्ट जीडीएस जॉब नोटिफिकेशननुसार इच्छूक आणि पात्र उमेदवार इंडिया पोस्टच्या indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्म एडिट विंडो १७ ते १९ फेब्रुवारीपर्यंत खुली राहील. या भरतीप्रक्रियेंतर्गत महाराष्ट्रामध्ये २ हजार ५०८ जागा भरल्या जातील.
इंडिया पोस्ट जीडीएस भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी पात्रता आणि अटीशर्ती पुढीलप्रमाणे आहेत. या भरतीप्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार हा कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून दहावीच्या वर्गात गणिती आणि इंग्रजी शिकलेला असावा. उमेदवारांचं वय किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षांपर्यंतच असावं. मात्र आरक्षित वर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार कमाल वयामध्ये सवलत देण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्यासाठीचं शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागतील. मात्र सर्व महिला, ट्रान्स वुमन आणि सर्व अनुसूचित जातीच्या उमेदवारांना शुल्कामधून सवलत देण्यात आली आहे.