नेहरू युवा केंद्रात बंपर भरती; 10 वी पास उमेदवारांनो, उद्यापर्यंतच शेवटची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 04:19 PM2021-02-19T16:19:19+5:302021-02-19T16:20:03+5:30
Nehru Youth Center job vacancy : नेहरू युवा केंद्र हे भारत सरकारची संघटना आहे. जे क्रीडा मंत्रालयांतर्गत येते. या भरतीसाठी 5 फेब्रुवारीपासून अर्ज मागविण्यात आले आहेत. केवळ एक मुलाखत देऊन तुम्ही एनवायकेमध्ये स्वयंसेवक बनू शकणार आहात.
Vacancy for 10th pass: 10 वी पास झालेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सरकारी संघटनेसोबत काम करण्याची पगार मिळविण्याची ही बंपर संधी आहे. नेहरू युवा केंद्र (Nehru Yuva Kendra) मध्ये 13000 हून अधिक जागांवर भरती काढण्यात आली आहे. नेहरू युवा केंद्र संघटना (NYKS) ने ही भरती प्रक्रिया सुरु केली आहे. (Nehru Yuva Kendra recruiting on 13206 posts)
नेहरू युवा केंद्र हे भारत सरकारची संघटना आहे. जे क्रीडा मंत्रालयांतर्गत येते. या भरतीसाठी 5 फेब्रुवारीपासून अर्ज मागविण्यात आले आहेत. केवळ एक मुलाखत देऊन तुम्ही एनवायकेमध्ये स्वयंसेवक बनू शकणार आहात. यासाठी तुम्हाला भारत सरकारकडून दर महिन्याला पगारही दिला जाणार आहे.
पदाचे नाव...
नॅशनल यूथ व्हॉलेंटिअर (National Youth Volunteer)
पदांची संख्या - 13206
शिक्षण - मान्यता प्राप्त बोर्डाकडून 10 वी पास.
वयाची अट - 1 एप्रिल 2021 पर्यंत वय 18 ते जास्तीत जास्त 29 वर्षे असायला हवे.
अर्ज कसा कराल
नॅशनल यूथ व्हॉलेंटिअरच्या भरतीसाठी तुम्हाला नेहरू युवा केंद्राच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. nyks.nic.in वर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक पुढे देण्यात आली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही काही मिनिटांत अर्ज करू शकणार आहात. अर्ज करण्यासाठी तुम्हाला उद्याचाच दिवस उरला आहे. यासाठी कोणतेही अर्जशुल्क असणार नाही.
10 वी पास पण कसे....
10 वी पास झालेले परंतू जे कोणत्याही रेग्युलर कोर्ससाठी किंवा फुलटाईम कोर्ससाठी गेलेले आहेत ते या भरतीसाठी पात्र नाहीत.
NYK volunteer job notification 2021 साठी इथे क्लिक करा...
Apply करण्यासाठी इथे क्लिक करा...
नौदलात मोठी भरती, दहावी उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी
Indian Navy Tradesman Recruitment 2021: भारतीय नौदलात सेवा बजावण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरूणांसाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. या अंतर्गत ईस्टर्न नेव्हल कमांड, वेस्टर्न नेव्हल कमांज आणि सदर्न नेव्हल कमांडमध्ये १,१५९ पदांसाठी अर्ज मागवण्यात आलं आहेत.
२२ फेब्रुवारी सकाळी १० वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. तसंच ७ मार्च संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारांना अरज करता येतील. यामध्ये ईस्टर्न नेव्हल कमांडसाठी ७१० पदं, वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये ३२४ पदं, सदर्न नेव्हल कमांडमध्ये १२५ पदं अशा एकूण १,१५९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना मॅट्रिक्स लेव्हल १ च्या आधारावर वेतन मिळेल. निवड झाल्यानंतर उमेदवारांना १८ हजार रूपयांपासून ५६,९०० रूपयांपर्यंत वेतन देण्यात येईल.