महाविद्यालयीन तरुणाच्या मदतीने केली घरफोडी
By admin | Published: August 20, 2016 10:22 PM2016-08-20T22:22:08+5:302016-08-20T22:22:08+5:30
जळगाव - आसोदा रस्त्यावरील मोहन टॉकीजच्या मागे राहणार्या नारायण देवराम सोनार यांच्याकडे घरफोडी करणार्या ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर (वय ३५) व हितेंद्र शिवाजी परदेशी (वय २३) दोन्ही रा.कांचन नगर यांना शनी पेठ पोलिसांनी शनिवारी सकाळी जेरबंद केले. यातील बाविस्कर हा सराईत गुन्हेगार आहे तर परदेशी हा मुक्त विद्यापीठात बी.कॉमच्या दुसर्या वर्षाचे शिक्षण घेत आहे.सध्या तो सेल्समनचे काम करतो. त्याच्या मदतीने बाविस्करने घरफोडी केली होती.
Next
ज गाव - आसोदा रस्त्यावरील मोहन टॉकीजच्या मागे राहणार्या नारायण देवराम सोनार यांच्याकडे घरफोडी करणार्या ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर (वय ३५) व हितेंद्र शिवाजी परदेशी (वय २३) दोन्ही रा.कांचन नगर यांना शनी पेठ पोलिसांनी शनिवारी सकाळी जेरबंद केले. यातील बाविस्कर हा सराईत गुन्हेगार आहे तर परदेशी हा मुक्त विद्यापीठात बी.कॉमच्या दुसर्या वर्षाचे शिक्षण घेत आहे.सध्या तो सेल्समनचे काम करतो. त्याच्या मदतीने बाविस्करने घरफोडी केली होती. ३ जून रोजी या सोनार यांच्या बंद घराचे कुलूप तोडून साडे ७७ हजार ८८७ रुपयांचे दागिने लंपास केले होते.दरम्यान याच दिवशी एसएमआयटी परीसरातील गुड्डुराजानगरात गोरखनाथ काशीनाथ वाणी या बांधकाम व्यावसायिकाच्या घरातूनही २५ हजाराच्यावर रोकड लांबवण्यात आली होती. दोन्ही ठिकाणी चोरीची सारखीच पध्दत असल्याने या दोघांचा त्यात सहभाग आहे का? याची पोलीस चौकशी करीत आहेत.आयुष्याची कमाई मिळालीनारायण सोनार हे सेवानिवृत्त असून निवृत्तीनंतर जमलेल्या पैशात त्यांनी दागिने करुन ठेवले होते. सुन गायत्री यांच्या पगाराचे डब्यात ठेवलेले सात हजार रुपया सुरक्षित राहिली आहे.आयुष्याची कमाई चोरट्यांनी चोरुन नेल्याने ते चिंतेत होते.या घटनेमुळे त्यांची सून अक्षरश: रडल्या होत्या. गुन्हा उघडकीस आल्याचे समजल्यानंतर त्यांच्या चेहर्यावर आनंद फुलला होता.श्वानने दाखविला होता मागघटनेच्या वेळी श्वान व ठसे पथकाला पाचारण करण्यात आले होते. तेव्हा कांचन नगरच्या दिशेने श्वानने माग दाखविला होता, त्यामुळे चोरटा याच भागातील असल्याचा संशय होता. परिसरातून माहिती काढली असता बाविस्कर हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याने त्याच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. दागिने विक्री करतांना चोरटा हमखास सापडेल असे पोलिसांनी या भागात जाहिर केले होते, त्यामुळे बाविस्कर याने दोन महिने दागिनेच विकले नाहीत असे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी सांगितले.चोरी पाच लाखाची नोंद ७७ हजाराची चोरट्याने रॉडच्या सहाय्याने दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता. कपाटातील लॉकरमधून पाच तोळे सोने चोरून नेले. यात मंगल पोत, अंगठी, कानातले अशा दागिने असा पाच लाख रुपयांचा ऐवज चोरी गेल्याचे सोनार यांनी तेव्हा सांगितले होते, मात्र पोलीस स्टेशनला ७७ हजार ८८७ रुपयाच्या दागिन्याची नोंद करण्यात आली होती.