रेल्वे रुळावर नोटांची बंडले, ५००-२००० रुपयांच्या नोटांचा खच, पाहून कर्मचाऱ्यांनाही बसला धक्का, आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 02:01 PM2021-08-26T14:01:37+5:302021-08-26T14:03:03+5:30
Cash Found on Railway Track: तामिळनाडूमधील धर्मपुरी येथे रेल्वे रुळावर नोटांची बंडले आणि ५०० तसेच २००० हजार रुपयांचा नोटांचा खच पाहून रेल्वे कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
चेन्नई - तामिळनाडूमधील धर्मपुरी येथे रेल्वे रुळावर नोटांची बंडले आणि ५०० तसेच २००० हजार रुपयांचा नोटांचा खच पाहून रेल्वे कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. (Cash Found on Railway Track) मात्र या नोटा ताब्यात घेण्यासाठी रेल्वे कर्मचारी जेव्हा या नोटांच्या गठ्ठ्याकडे पोहोचले तेव्हा त्यांना अजून एक धक्का बसला. या सर्व नोटा नकली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर रेल्वे पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. आता पोलीस या नोटांबाबत अधिक तपास करत आहेत.(Bundles of notes on the railway tracks, the cost of Rs 500-2000 notes, the staff was shocked to see )
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार धर्मपुरीजवळ रेल्वे ट्रॅकवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी २००० आणि ५०० रुपयांच्या नकली नोटा पाहिल्या. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. रेल्वे कर्मचारी रामकुमार हा बंगळुरूहून सालेमच्या दिशेना जाणाऱ्या मार्गावर थोपपूरजवळ रुळांच्या देखभालीसाठी जात होता. तेव्हा त्याला दोन हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा ट्रॅकवर मिळाल्या.
रामकुमार याने त्वरित याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सब-इंस्पेक्टर वेंकटचलम यांच्या नेतृत्वाखाली एक टिम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी दोन हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा तपासल्या. तेव्हा या नोटा नकली असल्याचे दिसून आले. या नोटांमध्ये एक कार्टुन छापलेले होते.
दरम्यान, रेल्वे पोलिसांनी विखुरलेल्या या नोटा जप्त केल्या आहेत. नोटांचे हे बंडल एका बॉक्समध्ये पॅक केले होते. त्यामुळे संशय निर्माण होत आहे. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे.