प्रसाद म्हणून मंदिरात वाटले जाते बर्गर, सँडविच
By admin | Published: March 27, 2017 03:52 PM2017-03-27T15:52:43+5:302017-03-27T15:54:44+5:30
भारतामध्ये प्रत्येक मंदिरात देवांना वेगवेगळा नैवैद्य चढवला जातो आणि मंदिरात येणा-या भाविकांसाठी तो प्रसाद म्हणून दिला जातो.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - भारतामध्ये प्रत्येक मंदिरात देवांना वेगवेगळा नैवैद्य चढवला जातो आणि मंदिरात येणा-या भाविकांसाठी तो प्रसाद म्हणून दिला जातो. पण दक्षिणेकडील एका मंदिरात या पदार्थांऐवजी चक्क फास्ट फूडच प्रसाद म्हणून वाटलं जातोय. दक्षिणेकडच्या मंदिरात पोंगल किंवा पायसम हे पदार्थ प्रसाद म्हणून वाटत असतात. पण चैन्नईमधल्या जया दुर्गा पीठात भक्तांना प्रसाद म्हणून ब्राऊनी, बर्गर, सँडविच, चेरी टॉमेटो सॅलॅड दिले जात आहे.
मंदिरातल्या एका कर्मचा-याने टाइम्स ऑफ इंडिया दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की, जे अन्न सकस असते आणि चांगल्या मनाने बनवले जाते ते देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करायला काय हरकत आहे, मग ते पारंपारिक पदार्थ असो किंवा फास्ट फूड असो. आमच्या जया दुर्गा मंदिरातला प्रसादच त्याचे वैशिष्टय आहे त्यामुळे अनेक भक्त येथे प्रसादासाठी येतात.
त्या कर्मचाऱ्याने पुढे बोलताना सांगितले की फास्टफूड सोडाच वाढदिवासाच्या दिवशी अनेक भक्त मंदिरात देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात, तेव्हा त्यांच्यासाठी खास केकही तयार करण्यात येतात. बाकीच्यांचे माहित नाही पण इथल्या स्थानिकांना मात्र हा प्रसाद आवडत आहे.