५० बेवारस कुत्र्यांना जिवंत जाळले
By admin | Published: June 16, 2016 04:07 AM2016-06-16T04:07:26+5:302016-06-16T04:07:26+5:30
चेन्नईपासून ५० किमी अंतरावर किझामूर गावात गेल्या ५ जून रोजी गावकऱ्यांनी ५० कुत्र्यांना रॉकेल ओतून जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. जाळण्यापूर्वी या कुत्र्यांना कीटकनाशक
चेन्नई: चेन्नईपासून ५० किमी अंतरावर किझामूर गावात गेल्या ५ जून रोजी गावकऱ्यांनी ५० कुत्र्यांना रॉकेल ओतून जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. जाळण्यापूर्वी या कुत्र्यांना कीटकनाशक मिसळलेले खाद्य देऊन शांत करण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कुत्र्यांनी मेंढ्या आणि बकऱ्यांच्या कळपांवर हल्ला केल्याने त्यांना ठार मारण्यात आले. प्राण्यांच्या अधिकारांसाठी लढणारे पी. आश्वत यांना एका गावकऱ्याने ही माहिती दिली तेव्हा झाला प्रकार उघडकीस आला. आश्वत यांनी चार दिवसांनी या दु:खद घटनेचे वास्तव समोर आणले.
त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुरली, मुथु, मुरुगॉदास आणि जीवा नामक चार गावकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
काही बेवारस कुत्र्यांनी मेंढ्या आणि बकऱ्यांच्या कळपावर हल्ला केल्याने त्यातील काही जखमी झाल्या होत्या. नंतर कुत्रे चावल्याने काही मृत्युमुखी पडल्या. परंतु कुत्र्यांच्या हल्ल्यात कुठलाही प्राणी जखमी झाल्याचे निदर्शनास आले नसल्याचे पी. आश्वत यांचे म्हणणे आहे. पंचायतीने मला कुठल्याही कुत्र्यांची हत्या करण्यात आली नसल्याचे सांगितले असले तरी
५० कुत्री ठार मारण्यात आल्याचा पुरावा माझ्याकडे आहे.