ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाच्या ड्रायव्हरला जिवंत जाळले
By Admin | Published: October 28, 2016 04:05 PM2016-10-28T16:05:45+5:302016-10-28T16:05:45+5:30
शुक्रवारी सकाळी अनेक प्रवाशांच्या समोर ही धक्कादायक घटना घडली. मनमीत अलीशेर असे या (२९) वर्षीय ड्रायव्हरचे नाव आहे.
ऑनलाइन लोकमत
ब्रिस्बेन, दि. २८ - ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन शहरात भररस्त्यात एका भारतीय वंशाच्या ड्रायव्हरला जिवंत जाळण्यात आले. शुक्रवारी सकाळी अनेक प्रवाशांच्या समोर ही धक्कादायक घटना घडली. मनमीत अलीशेर असे या (२९) वर्षीय ड्रायव्हरचे नाव आहे. मनमीत अलीशेरचा जागीच मृत्यू झाला.
येथील पंजाबी नागरीकांमध्ये मनमीतने गायक म्हणून ओळख मिळवली होती. तो ब्रिस्बेन सिटी काऊंसिलच्या परिवहन विभागात ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. शुक्रवार सकाळी नऊच्या सुमारास मनमीत बस घेऊन ब्युडीसर्ट रोडवर आला. त्यावेळी काही प्रवासी बसमध्ये चढत असताना एका अज्ञात आरोपीने मनमीतच्या दिशेने ज्वलनशील पदार्थ फेकला.
या ज्वलनशील पदार्थाचा शरीराला स्पर्श होताच मनमीतच्या कपडयांनी पेट घेतला. यात त्याचा जळून जागीच मृत्यू झाला. या हल्ल्याचा मागचा उद्देश स्पष्ट झालेला नसून, पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.