बर्निंग ट्रेन! नवी दिल्लीत एक्स्प्रेसला लागली भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 04:33 PM2019-09-06T16:33:07+5:302019-09-06T16:33:58+5:30
आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही.
नवी दिल्ली - नवी दिल्लीरेल्वे स्थानकात थांबलेल्या एक्स्प्रेस ट्रेनला आज दुपारी भीषण आग लागली. चंदीगड-कोचिवली एक्स्प्रेसच्या पॉवर कारमध्ये ही भीषण आग लागली. अन्य दोन डब्यांपर्यंत आग पसरल्याने नवी दिल्ली स्थानकात काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकात ही एक्स्प्रेस ट्रेन थांबली होती. दरम्यान तिच्या पॉवर कारमधून प्रचंड धूर निघू लागला आणि धुराचे रूपांतर भीषण आगीत झाले. नंतर ही आग एक्स्प्रेसच्या अन्य दोन डब्यांमध्येही पसरली. आगीची माहिती कळताच प्लॅटफॉर्मवर असलेले प्रवासी इतरत्र पळू लागले. या आगीमुळे प्लॅटफॉर्मचे नुकसान झालं आहे. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहानी वा कोणीही जखमी झालेले नाही. एक्सप्रेसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
A fire has broken out in rear power car of Chandigarh-Kochuveli Express at platform number. 8 of New Delhi Railway Station. Four fire tenders are present at the spot. All passengers have been evacuated safely. https://t.co/KWkKjrIHkUpic.twitter.com/AvqrfyQyda
— ANI (@ANI) September 6, 2019
Fire which had broken out in rear power car of Chandigarh-Kochuveli Express at New Delhi Railway Station, has now been doused. pic.twitter.com/wv2JoL9cBf
— ANI (@ANI) September 6, 2019