इजिप्तमध्ये पर्यटकांच्या बसला भीषण अपघात; भारतीयासह 22 ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 07:49 AM2019-12-29T07:49:56+5:302019-12-29T07:50:52+5:30
भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.
कैरो : इजिप्तमध्ये पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बसला मोठा अपघात झाला असून त्यामध्ये 16 भारतीय पर्यटक जखमी झाल्याचे भारतीय दूतावासाने सांगितले आहे.
भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. सूझ शहरातील हॉस्पिटलमध्ये या पर्यटकांवर उपचार करण्यात येत असून भारतीय दूतावासाचे अधिकारी तेथे उपस्थित आहेत. सूझ शहर आणि कैरो येथील दोन संपर्क क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.
इजिप्तच्या ऐन सोखना येथे या बसला भीषण अपघात झाला. स्थानिक वृत्तसंस्थांनुसार दोन वेगवेगळ्या अपघातांत जवळपास 28 जण ठार झाले असून यामध्ये एका भारतीयाचा समावेश आहे. टेक्सटाईल कामगारांना घेऊन जाणारी बस एका कारवर आदळली. या अपघातात 6 जण ठार झाले आहेत.
Bus accident with 16 Indian tourists on board occured today near Ain Sokhna in Egypt. Embassy officials are at hospitals in Suez city and Cairo. Helpline numbers +20-1211299905 and +20-1283487779 are available. @DrSJaishankar@MEAIndia@CPVIndia@MOS_MEA
— India in Egypt (@indembcairo) December 28, 2019
तर दुसऱ्या अपघातात पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या दोन बस समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्या. यामध्ये 22 जण ठार झाले असून यामध्ये एका भारतीय पर्यटकाचाही समावेश आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तर 16 भारतीयांसह 24 जण जखमी झाल्याचे भारतीय दूतावासाने सांगितले आहे. मात्र, मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयाबाबत अद्याप कोणतीही माहिती दूतावासाने जाहीर केलेली नाही.