चित्रकूटमध्ये 64 प्रवाशांनी भरलेली बस पलटली, अनेक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 13:17 IST2018-10-04T13:17:01+5:302018-10-04T13:17:10+5:30
चित्रकूट जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एक मोठा अपघात घडला आहे. मेहरमधून शारदा मातेचं दर्शन घेऊन परतणा-या भाविकांवर काळानं घाला घातला आहे.

चित्रकूटमध्ये 64 प्रवाशांनी भरलेली बस पलटली, अनेक जखमी
उत्तर प्रदेश- चित्रकूट जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एक मोठा अपघात घडला आहे. मेहरमधून शारदा मातेचं दर्शन घेऊन परतताना हा अपघात झाला आहे. विशेष म्हणजे बस जेव्हा पलटली तेव्हा बसमध्ये 64 प्रवासी होते. या प्रकारानंतर परिसरातील लोकांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली असून, बचावकार्य राबवलं जातं आहे.
चित्रकूटमधल्या कोतवाली भागातील भंवरी गावातील पुलियाजवळच्या राष्ट्रीय महामार्गावर तांत्रिक बिघाडामुळे बसवरचा चालकाचा ताबा सुटल्यानं ती पलटली. या अपघातात आतापर्यंत 35 प्रवासी गंभीररीत्या जखमी आहेत. एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, बसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे बस पलटली, त्यावेळी बसमध्ये 64 प्रवासी होते. आतापर्यंत कोणाच्याही मृत्यूची माहिती मिळालेली नाही. जखमींवर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत.