45 यात्रेकरुंना घेऊन जाणारी बस उलटली, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 09:15 AM2020-10-10T09:15:34+5:302020-10-10T11:31:19+5:30
कानपूरहून दिल्लीला जाणारी ही बस टप्पल परिसरात येताच रस्ता भरकटल्याने खाली कोसळली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अलीगढ - उत्तर प्रदेशातील अलिगढ परिक्षेत्रात बस पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या बसमधून एकूण 45 प्रवासी प्रवास करत होते. अलीगढच्या टप्पल परिसरात या बसला अपघात झाला.
कानपूरहून दिल्लीला जाणारी ही बस टप्पल परिसरात येताच रस्ता भरकटल्याने खाली कोसळली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, बसमधील जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, मृतांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, अपघातातील जखमींना तत्काळ आणि योग्य उपचारसुविधा देण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने अलीगढ़ जिले के टप्पल क्षेत्र में हुए सड़क दुर्घटना में तीन लोगों की मृत्यु पर दुख जताया और जिला प्रशासन के अधिकारियों को निर्देश दिया कि दुर्घटना में घायल हुए लोगों को उचित उपचार प्रदान किया जाए। (फ़ाइल तस्वीर) https://t.co/xII3RPxcvbpic.twitter.com/BXRnGjE5w6
— ANI_HindiNews (@AHindinews) October 10, 2020