बस दरीत कोसळून २८ प्रवासी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 04:02 AM2017-07-21T04:02:24+5:302017-07-21T04:02:24+5:30

हिमाचल प्रदेशातील हिंदुस्थान-तिबेट राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी प्रवाशांना घेऊ न जाणारी बस ५00 फूट खोल दरीत कोसळून २८ प्रवासी मरण पावले

Bus collapsed in the valley and killed 28 passengers | बस दरीत कोसळून २८ प्रवासी ठार

बस दरीत कोसळून २८ प्रवासी ठार

Next

सिमला : हिमाचल प्रदेशातील हिंदुस्थान-तिबेट राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी प्रवाशांना घेऊ न जाणारी बस ५00 फूट खोल दरीत कोसळून २८ प्रवासी मरण पावले आणि नऊ जण जखमी झाले आहेत. रामपूर येथील खानेरी गावातील दरीमध्ये ही बस गुरुवारी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास कोसळली.
बसमध्ये सुमारे ३६ प्रवासी तसेच ड्रायव्हर व कंडक्टर होते. ही बस किन्नौरहून सोलनला जात असताना ही दुर्घटना घडली. सिमल्यापासून १२0 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५ म्हणूनही ओळखला जातो. मृतांमध्ये १८ पुरुष, ९ महिला व एक लहान मुलाचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस व स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्याला सुरुवात केली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चार जखमींची प्रकृती
चिंताजनक असल्याने मृतांचा
आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना १0 हजार रुपये तातडीची मदत म्हणून जाहीर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Bus collapsed in the valley and killed 28 passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.