भयंकर! 50 प्रवाशांना घेऊन निघालेल्या बस चालकाला आला हार्ट अटॅक; थरकाप उडवणारा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 12:05 PM2022-12-03T12:05:19+5:302022-12-03T12:06:15+5:30
बसच्या चालकाला अचानक हार्ट अटॅक आला आहे. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. चालकाच्या मृत्यूनंतर बस अनियंत्रित झाली आणि या बसने सहा जणांना चिरडलं.
मध्य प्रदेशमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जबलपूरमध्ये तब्बल 50 प्रवाशांना घेऊन चाललेल्या मेट्रो बसच्या चालकाला अचानक हार्ट अटॅक आला आहे. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. चालकाच्या मृत्यूनंतर बस अनियंत्रित झाली आणि या बसने सहा जणांना चिरडलं. या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. बसने ट्राफिक सिग्नलवर उभा असलेल्या लोकांना चिरडलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरच्या दमोह नाका परिसरात मेट्रो बस अनियंत्रित झाल्याने खळबळ उडाली. माणसं आणि वाहनांना धडक देत मेट्रो बस रस्त्याच्या कडेला थांबली. सुरुवातीला लोकांना वाटलं की मेट्रो बस ड्रायव्हर मद्यधुंद आहे, पण जेव्हा लोकांना मेट्रो बस ड्रायव्हर बेशुद्धावस्थेत आढळला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला आहे. बस चालकाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
Gut wrenching mishap. This happened after the bus driver suffered heart attack and died while the bus was in motion. #jabalpur@Gurjarrrrrpic.twitter.com/dzWcglvdi6
— Pranesh Kumar Roy (@roypranesh) December 2, 2022
बस चालवताना मेट्रो बस चालकाला हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि त्याचा बसवरील ताबा सुटला. या अपघातात मेट्रो बसने ई-रिक्षा, ऑटो रिक्षा आणि दुचाकी चालकांनाही धडक दिली. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेट्रो बस चालकाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
सध्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. कारण साधारणपणे थंडीच्या मोसमात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. मेट्रो बस चालकाला सकाळी अशाप्रकारे हृदयविकाराचा झटका येणे ही खरोखरच धक्कादायक घटना आहे. हा अपघात यापेक्षाही भयानक होऊ शकत होता, मात्र सुदैवाने बस रस्त्याच्या कडेला थांबली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.