जम्मू-काश्मीरच्या नवयुग बोगद्यात प्रवाशांनी भरलेली बस उलटली; अपघातात १२ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 00:34 IST2025-03-27T00:29:32+5:302025-03-27T00:34:51+5:30
बुधवारी रात्री उशिरा श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील नवयुग बोगद्यात बस उलटल्याने बारा प्रवासी जखमी झाले.

जम्मू-काश्मीरच्या नवयुग बोगद्यात प्रवाशांनी भरलेली बस उलटली; अपघातात १२ जण जखमी
श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील नवयुग बोगद्यात बुधवारी रात्री उशिरा एक बस उलटली. या बस अपघातात १२ प्रवासी जखमी झाले. पाच जखमींना उपचारासाठी अनंतनागच्या जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बोगद्यात झालेल्या बस अपघातामुळे वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. उलटलेली बस बोगद्यातून काढून सुरळीत वाहतूक करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे आणि अपघाताचे कारण शोधण्यास सुरुवात केली आहे.
तामिळनाडूत BJP-AIADMK युती होणार? अमित शांहाच्या भेटीनंतर पलानीस्वामींचे सूचक विधान
नवयुग बोगदा काश्मीर खोऱ्यातील काझीगुंड आणि जम्मू प्रांतातील बनिहाल क्षेत्रादरम्यान आहे,हा बोगदा पीर पंजाल पर्वतरांगाच्या उजव्या बाजूला आहे. जम्मू प्रांत आणि काश्मीर प्रांत यांच्यामध्ये नैसर्गिक भिंतीचे काम करतो. हा बोगदा ८.४५ किलोमीटर लांबीचा आहे. पीर पंजाल पर्वतरांगातील बनिहाल खिंडीतील जवाहर बोगद्याला पर्याय म्हणून हे बांधण्यात आले आहे.