बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 04:11 AM2024-09-21T04:11:56+5:302024-09-21T04:14:59+5:30

बीएसएफच्या तीन जवानांचा मृत्यू तर नऊजण जखमी झाले.

Bus of BSF jawans falls into valley; Three deaths | बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू

बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांत सुरक्षेसाठी तैनात केलेल्या बीएसएफ जवानांना घेऊन जाणारी बस बडगाम जिल्ह्यात शुक्रवारी दरीत कोसळली. त्यात बीएसएफच्या तीन जवानांचा मृत्यू तर नऊजण जखमी झाले.

जखमी जवानांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या अपघातातील मृत तसेच जखमी जवानांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत. तसेच ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्यापैकी किती जणांची प्रकृती स्थिर आहे याचा तपशीलही उपलब्ध झालेला नाही. बसला झालेल्या अपघातामागील कारणाबद्दल चौकशी पूर्ण झाल्यानंतरच ठोस माहिती देता येईल, असे पोलिसांनी सांगितले. बीएसएफ जवानांची बस दरीत कोसळल्याचे वृत्त कळताच तातडीने मदतकार्य हाती घेण्यात आले. (वृत्तसंस्था)

Web Title: Bus of BSF jawans falls into valley; Three deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.