चंबामध्ये राज्य परिवाहनची बस दरीत कोसळली; पाच ठार, 34 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 03:36 PM2020-03-10T15:36:12+5:302020-03-10T15:37:56+5:30
अपघात चंबा-पठानकोट राष्ट्रीय महामार्गावर हडोठाजवळ झाला. बस चंदीगडहून पठानकोटमार्गे चंबाला जात होती.
चंबा : हिमाचलच्या चंबा जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळी 6.30 वाजता रस्ते अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. चंदीगडवरून चंबाला जाणाऱ्या राज्य परिवाहनची बस दरीत कोसळली. या बसमध्ये 40 जण प्रवास करत होते.
हिमाचल प्रदेश रोडवेज ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची बस दरीत कोसळली. या अपघातात 34 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींना होशियारपूरच्या टांडामध्ये हलविण्यात आले आहे.
हा अपघात चंबा-पठानकोट राष्ट्रीय महामार्गावर हडोठाजवळ झाला. बस चंदीगडहून पठानकोटमार्गे चंबाला जात होती. चंबापासून जवळपास 25 किमीवर असताना बस दरीत कोसळली. स्थानिकांनी बचावकार्य सुरु केले. यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. जवळपास अडीच तास चाललेल्या बचावकार्यानंतर बसमध्ये अडकलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात आले.