प्लॅटफॉर्मवर बसलेल्या प्रवाशांसाठी काळ बनली बस, 3 जणांना चिरडलं; VIDEO पाहून अंगावर शहारा येईल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 02:13 PM2023-11-07T14:13:06+5:302023-11-07T14:13:45+5:30
मुख्यमंत्री कार्यालयाकडून (सीएमओ) जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात, मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचेही म्हण्यात आले आहे.
आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील पंडित नेहरू बस स्थानकात आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (APSRTC) बस अचानकपणे प्लॅटफॉर्मवर चढली आणि तेथे वाट बघत बसलेले तीन लोक या अपघातात चिरडले गेले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेसंदर्भात शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना 10-10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात आज सकाळी आठ वाजून 20 मिनिटांच्या सुमारास घडला. यात, आरटीसीची एक बस प्लेटफॉर्म क्रमांक 12 वर चढली आणि तील लोकांना चिरडले. या अपघातात जखमी झालेल्या एका 18 माहिन्याच्या चिमुकलीचा येथील रुग्णालयात मृत्यू झाला. प्रादेशिक व्यवस्थापक एम. येसू दनम यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'वाहन मागे घेण्याऐवजी चालकाकडून ते पुढे गेले आणि अपघात घडला.
VIDEO | At least three people were killed, including a woman and several others injured when a state transport bus rammed into a platform at a bus stand in Vijaywada, Andhra Pradesh, yesterday. The incident was caught on CCTV.
— Press Trust of India (@PTI_News) November 7, 2023
(Source: Third Party) pic.twitter.com/KvqLspIsW4
याप्रकरणी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी पीडितांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त करत, जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच, मुख्यमंत्री कार्यालयाकडून (सीएमओ) जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात, मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचेही म्हण्यात आले आहे.